Marathi Jokes | सर्वोत्तम विनोद New Marathi Funny Jokes sms status

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज मराठी विनोद सर्वोत्तम विनोद ~ Marathi Jokes, Marathi Vinod, Jokes in Marathi, marathi Whatsapp funny jokes, Funny,Husband Wife,Marriage,मराठी विनोद, मराठी विनोद sms, मराठी विनोद चुटकुले.

Marathi Funny Jokes

रिक्षावाला – बोला साहेब , कुठे जाणार ?
गंपू – नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.
गंपू – आं…रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षातक्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला – फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.
… गंपू – आणि थर्ड क्लास ?
रिक्षावाला – थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…!

बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…
बाबा:-ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..

Marathi funny jokes sms

नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो.

आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना.

नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं.

आजी : इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल

फुलटू आगरी इश्टाईल !
फुलटू आगरी इश्टाईल ! देवराम: ए बाला इक्र य. वेटर : क पाजे क तुला? देवराम : १ काॅपी कितीला ह ? वेटर : २० रुपे देवराम : तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क एरा समजतं क ? वेटर : डोका फोरु तुजा डोका फोरु.. ते झेरॉकचं दुकान हाय.

हे पण वाचा 👇🏻

मराठी टोमणे 

एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते….!!!

लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!

१० लाख..!!

१२ लाख..!!

१५ लाख..!!

गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का…??”

विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो…!!!

गोलू: २० लाख…!!!

 

व्हाट्सएप मराठी जोक्स
व्हाट्सएप मराठी जोक्स

व्हाट्सएप मराठी जोक्स

बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटीमोठ्याने म्हणाला

“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. .
.
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत,
.
त्यांच काय झाल ?

अगोदर वाईन शाॅप बंद व्हायचे तेव्हा बायका खुश व्हायच्या

.
आत्ता ज्वेलर्स बंद आहेत म्हणून नवरे खुश आहेत….
वेळ प्रत्येकाची येतेच

पोरींनी Miss Call ला इतकं बदनाम केलं आहे की,
.
.
.
चुकून कधी मित्राचा Miss Call आला तरी आई म्हणते…..
‘जा बघ….तुझी राणी तुझी आठवण काढतेय

Marathi funny Jokes

आई : बाळ तू खूप मोठा हो…

बाळ : आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो राहील.

आई : बाळ इतका मोठा नको होऊ कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात.

काही लोकं आपल्याच नाकात
आपलेच बोटं घालून गरागरा फिरवितात,
नाकातून बोट काढतात
आणि
बोटाकडे अश्या नजरेने पाहतात
जणू काही नाकातून एखादा मोतीच
बाहेर आलाय…!

दुकानदार .काय पाहिजे

गिऱ्हाईक . मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे
अक्कल पण पाहिजे

दुकानदार .सहेबांना एक दारू चा खंबा दे
आणि मुगदाळ दे पाच वाली

व्हाट्सएप मराठी जोक्स

भावा तुझ्यासाठी काय पण
म्हंनारे
.
.

पासवर्ड टाकतानी तिकड बग म्हंत्यात

मुलगी आयुष्यातून गेल्यानंतर माणूस खूप यशस्वी होतो
हे आज विराट कोहलीने दाखवून दिले….
.
.
म्हणून म्हणतो मित्रानो मुलीचा नाद सोडा आणि करीयर वर ध्यान द्या

सरदार – डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही ,
काय करू?

डॉक्टर- रात्री उठून उनात बसत जा, सगळे ठीक होईल

bhayanak marathi jokes

मुलगा रेल्वे चौकशी अधिकार्याला –
मुलगा : पुण्याला एक्सप्रेस गाड़ी कधी आहे ?

अधिकारी – २ ला

मुलगा – passenger ?

अधिकारी – ३ ला

मुलगा -लोकल ?

अधिकारी – ५ ला … पण तुम्हाला कुठे जायचे आहे ?

मुलगा – रुळावर हागायला

 

संग्राम – देवयानी मला जरा towel देता का?

देवयानी – मी तुमच्या बापाची नौकर नाहीये , तुमचे तुम्ही घ्या

संग्राम- ठीक आहे

देवयानी – संग्राम, मी संडासला बसले आहे, माझ्या हाताला मेंदी लावली आहे , धुवायला येता का?

संग्राम – आलोच ” तुमच्या साठी काही पण”

 

 

Navin Marathi jokes

Navin Marathi jokes
Navin Marathi jokes

शिक्षक:बंडू, उठ , मला सांग 57 भागिले 8 किती?

बंडू : 7

शिक्षक : बाकि?

बंडू : बाकि काही नाही, निवांत

संताला आपला कुत्रा विकायचा होता. आणि बंता त्याला विकत घेणार होता.

बंता – हा कुत्रा विश्वासू तर आहे ना ?

संता – हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो.

Marathi jokes sms

सरदारजी पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली –

सरदारजी – साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत

पोलिस – कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?

सरदारजी – साहेब … टेलिफोनवाले… म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.

एका सरदाराने 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून 5 रुपयाचे टिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, ” एप्रिल फुल”

” कसे काय?” कंडक्टरने विचारले.

” कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे”

Jokes Marathi

बनिया : हे केळ कसं दिलं ?

दुकानदार : 1 रुपया

बनिया : 60 पैशात देतोस का ?

दुकानदार : 60 पैशात तर फक्त याचं साल येतं.

बनिया : हे घे 40 पैसे, साल तु ठेवून घे आणि केळ मला दे.

नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’

मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’

नोकर – ‘म्हणूनच परत करीत आहे.’

Marathi funny jokes

न्यूटनच्या बायकोचा उखाणा :-
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून येडं शोध लावत बसलं…!!

जीन : काय हुकुम आहे आका?

आका: माझ्या आकाउंट मध्ये ५० करोड कॅश आणि कॅतरीना सोबत लग्न करवून दे

जीन: आका……………!

हुकुम करा मस्करी नको.

गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?

बंडू : माहीत नाही

गुरुजी : अरे असेकाय करतोस……? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ – १६०५
.
.
.
.
.
बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.

Navin marathi jokes

Navin marathi jokes
Navin marathi jokes

धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?
.
.
.
बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे….
.
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात…

आज बैलाला दारू पाजू
नका नाहीतर……
.
.
.
.
.
.
.
झिंगल बैल झिंगल बैल

marathi funny jokes

चम्प्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या – अबे एक तास झाला..जेवतोयेस तू..अजून किती चरशील?
.
.
.
.
चम्प्या – अबे मी पण परेशानझालोय..अजून तीन तास जेवायचंय..
झंप्या – ३ तास?
चम्प्या – हि बघ पत्रिका..
जेवणाची वेळ…७ ते ११

कुणी तुमच्या घरावर पान खाऊन थुंकत असेल तर ते पुसा!”- महात्मा गांधी.•
.
“पण लक्षात ठेवा ते पुसताना त्याचीच चड्डी वापरा!”- बाळासाहेब ठाकरे.•
.
.
“आणि मग ती त्यालाच घालायला लावा..”आणी त्या चड्डी सकट त्याला पण धूवुन काढा..!!- राज ठाकरे
.
.
धुवून झाली की ती चड्डी पुन्हा बाजारात विकायला काढ़ा – शरद पवार

Navin marathi jokes

बंडू अभ्यास करीत बसलेला असतो. पाहूणे घरी येतात , बंडू ला विचारतात ” बंडू बाबा घरी आहेत का ?”
.
.
बंडू ” मग मी काय मूर्ख आहे , जो अभ्यास करतोय ?”

आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
.
.
तुमचे डोळे पुसायला खूप जण येतील पण
..
.
.
.
.
नाकातला शेंबुड पुसायला कुणीही येत नाही…..
तेव्हा काळजी घ्या…. हिवाळा येत आहे..

Navin marathi jokes

उठा उठा
दिवाळी आली
.
.
.
.
.
.
बाजूवाली आयटम रांगोळी काढतेय 
तीला बघायची वेळ झाली

पेंशट: खुप पातळ संडासला होतय.
डाँक्टर:किती पातळ.
पेंशट:खुपच पातळ.
डाँक्टर:तरी साधारण किती पातळ.
पेंशट:इतके पातळ की तुम्हाला चुळ भरता येईल

Navin marathi jokes

बायको रात्री पलंगावर पडल्या पडल्या :-
अहो आज असे काहि करा कि माझे अंग घामाघूम.
झाले पाहिजे…
.
.
.बंड्या ऊठला आणि पंखा बंद करुन परत
झोपला..

.
सुचना :- प्रतेकाला माहिती आहे
“” मी चावट विनोद टाकत नाही “”

Navin marathi jokes
Navin marathi jokes

Navin marathi jokes

एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का…?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव
देव हसला अन म्हणाला,
Format केले पण virus नाही गेला.

45 वर्षांचा सलमान खान मुलगी बघायला जातो…

त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते..

शुद्धीवर आल्यावर बेशुध्द होण्याच कारण विचारलं..

तर म्हणाली..

“अग 20 वर्षांपूर्वी हा मला पण बघायला आला होता..

सलमान खान : मुझपर एक एहसान करना के मुझपर कोई एहसान ना करना…

सलमानचा ड्रायवर : मग कोर्टात सांगु का की गाडी तूच चालवत होतास ….?

सलमान खान : अरे चेष्टा करत होतो…तु लगेच सीरियस झाला

Navin marathi jokes

पेट्रोल आता तेव्हाच स्वस्त होइल

जेव्हा ते

.
चाइना वाले काढतील……

एका सभेत अत्रे ह्यांचे भाषण सुरु होते, मध्येच टवाळ माणूस
ओरडला,

”अत्रे तुम्ही कुत्रे….”

काही वेळ सर्वत्र शांतता पसरली.
.
.

अत्रे त्याला म्हणाले, “ठीक आहे. मग तुम्ही विजेचा खांब
आणि मोटारीचे टायर

Marathi vinod jokes

चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात…

चिंगी : कसं काय?

चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!!

गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो आणि विचारतो तुला आई ओरडत
नाही का?

ती मुलगी :- हो,
.

.
आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून…

Marathi vinod jokes

एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं..
ती भडकली,
तीने त्याला धू धू धुतला..
अगदी लोळवला..
तो कपडे झटकत उठला..
आणि म्हणाला..

तर मग मी नाही समजू का..?

तीन उंदीर गप्पा मारत असतात
पहिला उंदीर :
मी विषारी गोळ्या आरामातचघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर
आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायलालागतो,
पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात,
काय झाल कुठे चालला?
.
.
.
. .
.
.
.
तिसरा उंदीर म्हणतो
आलोच मांजरीचा कीस घेवून… !

Marathi vinod jokes

मी ११ वी मध्ये होतो
तेव्हा ची गोष्ट
एकदा मी एका मित्राच्या भावाच्या लग्नात
सायकलचे ब्रेक घेवुन नाचत होतो
.
.
तेवड्यात मला नवरदेवाणे जवळ बोलावले
आणि: ये हे काय करतोयस?
.
.
मी : दिसत नाय का रताळ्या
ब्रेक डांस……

रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी”अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय माझं एक दोस्त व्हता,
‘प्रकाश’नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
. पण पुढे तो पावसात भिजला नि विझला…
. … . …
रजनीकांत: मग काय केलं?. . . . . …
.
.
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो….
‘ज्योती’नावाची. ..

Marathi vinod jokes

जोशी काकूंच्या दारावर चिंटू
टकटक करतो.
जोशी काकू – कोण आहे?
चिंटू – मी
जोशी काकू – मी कोण?
चिंटू – तुम्ही जोशी काकू

जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,
रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?
जुली : बॉस ने विचारला ” आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो
रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?
जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला…

Jokes in Marathi

प्रियकर (प्रेयसीला) : “दुनिया भुलाई मैने तेरे लिये” … “जन्नत सजाई मैने तेरे लिये”
.
पर तुमने क्या किया मेरे लिये?
.
.
.
.प्रेयसी : “मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये”

पत्नी : तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की, मी खूप चांगला स्वयंपाक
करते?

पती : तुझ्याशी लग्न करण्याचं काही तरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना!

बंता : चुकी झाल्यावर माफी मागणारा माणसाला काय म्हणतात?

संता : समजदार

बंता : फारच सुंदर आणि चुकी नसताना मागानारयाला काय म्हणतात?

संता : बॉयफ्रेंड

Marathi funny jokes

एकदा झंप्याला exam madhye काहिच येत नाही..
..
तो पेपर मध्ये लिहितो
..
..
“गाय हमारी माता है,
हमे कुछ नही आता है!”
..
..
त्या वर सर रीमार्क लिहितात
..
..
“बैल तुम्हारा बाप है,मार्क देना पाप है

राज ठाकरे साहेब ईफेक्ट !!
.
.
.
शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो? तुझे मित्र
बघ कसे वेळेवर येतात.
तुला त्यांच्याबरोबर झुंडीने यायला काय
झाले? .
.
.
विद्यार्थीः सर, झुंडीने तर कुत्रे येतात, वाघ
नेहमी एकटाच येतो.

Jokes in Marathi

1000 मुलीँने Suicide केला..
300 कोमामध्ये आहे.
.
.
आणि,100 मुली बेशुध्द झाल्या..
.

.कारण…!!
.
.
कोणत्या तरी हरामखोराने
अफवा पसरवली की….
.
.
मिस-काँल केल्याने 20 पैसे कटतात…

मराठी वाक्याचे दोन अर्थ या विषयावर
शाळेत मराठीचा क्लास चालू होता.

बाई : हे बघा मुलांनो ,
मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!

मन्या : बाई काढून दाखवा ना !!!!!

बाई ( लाजुन ) : खाली बस मन्या येडया !
तुझ्या या वाक्याचे देखील २
अर्थ निघतात !

Jokes in Marathi

एकदा एका रिक्षात प्रेमी कीस करत होते ..!!
.
ड्रायवर त्यांना आरशातून बघत होता…
.
पुढे जाऊन त्यांचा एक्सिडेंट झाला ..
.
मग

डोक्याला त्याने हात लावला आणि म्हणाला …
.
आयचा घो मला आता समजलं टायटानिक का बुडल ते ..!!

Marathi Jokes sms

शाळा तपासणी अधिकारी – बाळ तुझा नाव काय ?

बाळ – पांडू

शाळा तपासणी अधिकारी – बाळा पांडू नाही …. पांडुरंग बोलायचं ….(दुसऱ्या मुलाकडे बघून) ….. हा बाळ तुझा नाव काय??

दुसरा मुलगा – बंडूरंग

शिक्षक : मंग्या, सांग असा कोणता प्राणी आहे जो हवेत उडतो पण जमिनीवर पिल्लाना जन्म देतो ??
.
.
.
.
.
मंग्या : एअरहोस्टेस…..

Marathi Jokes sms

एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली,
“मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे..”

प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?

मुलगी : हो.. काहीही.. प्रोफेसर : ..!!

प्रोफेसर : बघ बरं…पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील??

मुलगी : हो मी काहीही करायलातयार आहे.. हाच माझा फायनल डिसिजन
आहे..
.
.
.
प्रोफेसर : ठीक आहे मग.. “अभ्यास कर”….!!

एकदा एका गुंडाने दिनू च्या बायकोला किड्नाप केलं, तीच बोट कापून दिनू
च्या घरी पाठवलं आणि पैशांची मागणी केली…..
.
.
. .
.
.
दिनू ने बोट परत पाठवलं व त्याच्याबरोबर एक संदेशही…
पागल, उंगली से थोडेही पता चलता है…….खोपडी भेज खोपडी!!!

Marathi Jokes sms

चांगल्या मुलींच्यात आणि डायनासोरस मध्ये काय साम्य आहे ..???
.
.
लई काय विचार करू नका …
.
.
.
.दोन्ही पण अरबो वर्षा पूर्वी नाहीसे झालेत

वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबरनिघाले..
.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे ?
.
बंडू रडत रडत,
.
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आहे.

Marathi Jokes sms

शिक्षीका-मन्या दोन दिवस
शाळेत आला नाहीस का ?
परवा काय झालं

मन्या-बाई परवा माझी
चड्डी ओली होती वाळली
नव्हती

शिक्षीका-काल का आला
नाहीस?

मन्या-काल मी शाळेत येत
होतो तुमच्या घराजवळ
आलो तेव्हा तुमची चड्डी
मी वाळत घातलेली
पाहिली मला वाटलं तुम्ही शाळेत येणार नाहीत

Marathi jokes for whatsapp

मराठी मुलगा त्याच्या प्रेयसीला: u r so hot
baby.
.
.
.
.
.

प्रेयसी त्याच्या कानाखाली वाजवते
आणि बोलते साल्या १०४ degree ताप

आहेमला आणि तुला आशिकी सुचते ????

बाई – बाबा माझे पति रोज मध्यरात्री बाहेर जातात आणि सकाळी घरी येतात . . .

बाबा – सुंदरी, हि समस्या आहे का आमंत्रण ???

चिंगी : मंग्या , तुला किती बहिण भाऊ आहेत ?
मंग्या : ८
चिंगी : आई बापाला काही काम नव्हते का ?
मंग्या : तुम्ही किती आहात ??
चिंगी : मी एकुलती एक आहे.
मंग्या : बापात दम नव्हता का ?.

Marathi jokes for whatsapp

मक्याचा मुलगा ‘ये जवानी हे दिवाणी’ पाहून घरी येतो….आणि मक्याजवळ
जाऊन म्हणतो;
मुलगा : पापा….मै
उडणा चाहता हू…गिरणा चाहता हू….डुबणा भी चाहता हू…
बस रुकणा नाही चाहता…!!!!!
.
.
.
.
.
.
.
मक्या मुलाच्या हातात मोबाईल देतो आणि म्हणतो , ” ए रताळ्या हा घे
फोन….आणि बस TEMPLE RUN खेळत…”

shopping mall मध्ये –
sunny leone- ट्रायल रूम कुठे आहे ?
.
.
सेल्समन – आता आमच्या पासून काय लपवता . . . 20 GB चे कलेक्शन आहे !

Marathi jokes for whatsapp

बंड्या – बाबा मला blackberry किंवा apple पाहिजे !
.
.
बाबा – कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी

एका बाई ने
येणाऱ्या बसला थांबवले …
.
Driver : कुठे जाणार ..?
.
.
बाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय
जरा पोमपोम वाजवून दाखवा की …..!!!!!!!!

Marathi jokes for whatsapp

गब्बर :- मी आज बसंती ला आंघोळ
करतांना बघितलं.
विरू :- कुत्ते , कमीने मै तेरा खून पी जाऊंगा.
.
.
.
गब्बर :- अबे पागल्या, मी आंघोळ करत
होतो आणि ती रस्त्यावरून जात होती

बॉस :- तुला नोकरी वरून
काढल्यापासून तू रोज
माझ्या घरासमोर
शौचालयास का बसतोस ?
.
.
मक्या :- मला हे
दाखवायचे
कि,
तुम्ही मला नोकरीवरून
काढल्यामुळे
मी उपाशी नाही मरत!

मराठी विनोद sms

मक्या चा मुलगा : बाबा , माना सांगा तुम्ही जास्त हुशार की मी ?
मक्या: अर्र मीच ! कारण मी तुन्झा बाबा आहे .
मुलगा : व्हाय काय बाबा , मग माना सांगा अमेरिकेचा शोध कुणी लावला ?
मक्या : कोलंबस .
मुलगा : मंग , त्याच्या बाबांनी का नाही लावला ?
मक्या : र बाला पण त्या कोलंबसचा शोध त्याच्या बापानच लावला ना..मंग आता सांग कोण हुशार….

झंप्या : अगं आपलं लग्न झाल्यावर तुझा बाप हुंड्यात मला कार देईन ना?

चिंगी : तुला, कशाला हवी आहे कार? देवाने दोन पाय कशाला दिलेत?
.
.
झंप्या : ब्रेक आणि एक्सीलरेटर दाबायला

मराठी विनोद sms

बंड्या : रजनीकाका, शाळेत असताना तुम्ही माँनिटर म्हणुन धम्माल केली असाल ना ? . . . एखादी गंमत सांगा ना . . .
.
.
.
.
.
रजनी : एकदा वर्गात एक पोरगा खुपच “दंगा” करत होता . . . मी एकदाच म्हटल त्याला . . . “ए ढक्कन, गप ए…”
आज तो “पंतप्रधान” झालाय . . . !!

संता घरी येउन आरशासमोर उभा राहतो
… आणि २ ० मिनिट्स विचार करतो कि समोरचा माणूस कोण आहे ?
.
.
.
२ ० मिनिटानंतर . . .
हात्तेच्या मायला … हा तर कटिंगला माझासमोर बसलेला माणूस आहे !

मराठी विनोद sms

संता आणि त्याची बायको बस मधून प्रवास करत होते …

बायको – आहो बघा ना , माघचा माणूस माझ्या ब्लाउस मध्ये हात घालतोय !!!

संता – घालू दे ग … पैसे तर माझ्या खिशात आहेत !!!

रजनीकांत मक्याला विचारतो

रजनीकांत -Prove sin x = 6 n

मक्या – हात्तेच्या मायला … लई सोपय
मक्या ने बाजूचे ‘n’ cancel केले
आणि खाली लिहिले
six=6
तुझ्या मायला तुझ्या … असले फालतू प्रश्न विचारात जाऊ नको मला !

मराठी विनोद sms

रजनीकांत चा मुलगा – आय्यो मेरा पप्पा इतना लंबा हे के खडे खडे चलता पंखा रोक देता !
.
.
मकरंद अनासपुरे चा मुलगा – उसमे कोणती मोठी गोष्ट हें ? मेरे वडील भी लम्बेच हें , लेकिन वो ऐसा आगाउपणा नाही करते !

मुलगी :” जानु मी तुझ्या स्वप्नात येते का ?..
.
मुलगा:” नाही..
.
मुलगी :” का ??
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : कारण, मी हनुमान चालीसा वाचुन झोपतो

मराठी विनोद sms

Boyfriend : मी तुझ्या रोज
रोजच्या मागण्यांनी
तंग आणि कफल्लक होऊन
आत्महत्या करतोय..

..
. Girlfriend: बस करना रडवशील आता,,
१ चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे…..
.
.
..
१०व्या ला काय घालू..!

Comedy Marathi jokes

रजनीकांत Vs मक्या :

रजनी – रामा इज एक़्वल टू पक्या , हे प्रूव्ह करून दाखव … बघू तुझं नॉलेज …

मकरंद
– हात्तेच्या… लई सोप्पय.. रामाच्या उलटे करा , मारा , आता माराला हिंदीत
काय म्हणत्यात .. “पिटो”.. त्याच्या उलटे करा “टोपी “. आता टोपीला इंग्लिश
मध्ये काय म्हणत्यात , ” क्याप “.. त्याच्या उलटे काय … “पक्या”..
म्हणून रामा इज इक्वल टू पक्या … !

मास्तर : गण्या आलास का तू शाळेत ….???

गण्या : मास्तर का बोर करताय दिसतोय
ना म्हणजे आलोय शाळेत …

मास्तर : अरे गधड्या आसं बोलतात
का मास्तर बरोबर …?? … …

गण्या : ओं मास्तर गप्पं बसा ना आधीच तर
आईटम सकाळपासून फेसबुक वर
नाही आली म्हणून डोकं दुखतय ,,

जाऊ का परत घरी …???

Comedy Marathi jokes

झम्प्याची प्रेयसी ( फुल लाडात येऊन )
त्याला म्हणते..
..
काळे काळे ढग दाटून आले कि,
तुझी आठवण येते..
ओल्या मातीचा सुगंध आला कि,
तुझी आठवण येते..
थेंबाचा टपटप आवाज आला कि,
तुझी आठवण येते…
.
.
झंप्या लगेच तिला म्हणतो….” हा हा….माहित आहे ..माहित आहे..
तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून..देतो तुला उद्या “

शिक्षिका – चल अल्फाबेट म्हण गोलू .
गोलू – A – – – E F G H I J K L M N O – Q R S T U V W X Y Z
.
शिक्षिका – अर्रे मुर्खा B P C D कुठंय ? ? ? !
.
.
गोलू – कालच मित्राला दिली !

Comedy Marathi jokes

शिक्षिका – बंड्या
शिक्षिका – मुलानो १ कविता पाठ केली तर मी गालाचा किस देणार ,
२ केल्या तर ओठाचा देणार .
.
.
बंड्या – बाई अंथरूण टाका माझ्या सगळ्या कविता पाठ झाल्या ! ! !

चिंगी – जर चान्स भेटला तर माझ्याशी लग्न करशील चम्प्या??? .
.
.
.
… .
.
.
चम्प्या – जर चान्स भेटला तर लग्न करायची काय गरज आहे…

Comedy Marathi jokes

बंडू: आजोबा हे फ्यामिली प्लानिंग म्हणजे
काय?

आजोबा: (रागावून)मला माहित नाही चल
दुसरीकडे जाउन खेळ ..
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
.
. बंडू: मला माहितीये थेरड्या तुला माहित
नाही फ्यामिली प्लानिंग म्हणजे काय
तुला जर माहिती असत तर तुझ्या प्रोपरटीचे १२ हिस्से झाले नसते ..

सून सासूला म्हणाली,
‘‘तुम्ही दागिने घालू नका.
सगळे दागिने मला देऊन
टाका.’’
सासू म्हणाली, ‘‘अगं, पण मग
मी काय घालू?’’
.
.
.
सून म्हणाली,
‘‘तुम्ही सूर्यनमस्कार
घाला.
उत्तम आरोग्य हाच
खरा दागिना!!’

funny marathi jokes for whatsapp

मुलगी bike वर
मुलगी : अरे माझ्या पप्पानी मला तुझ्या bike वर बघितले !!!! !!!
. .
. .
मुलगा : !!! काय म्हणाले मग तुला ???
.
.
.
मुलगी : काय सांगू तुला… माझ्याकडून बस चे पैसे परत घेतले , . . .
खूप strict family आहे माझी

अमेरिकेतील एक इंजिनीअर
पुण्यात आप्पा बळवंत चौकात
येतो …

रस्त्यावर एक पुस्तक
पाहून
तो चक्कर येवून
पडतो ,
पुस्तकाचे नाव असते ,
.
.
.
.
‘३० दिवसात इंजिनीअर बना’ !!!

funny marathi jokes for whatsapp

मुलगी: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस…???
मुलगा: मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो… आणि तू काय करतेस…???
.
.
मुलगी: मी “माणिकचंद” च्या २ पुड्या खाते

मध्यम वयाची शिक्षिका शाळेत व्याकरणातले काळ शिकवत असते….
सोप्पा प्रश्न विचारते….
सांगा, “मी सुंदर आहे…”
हा कोणता काळ आहे???
.
.
कोपरातून आवाज येतो, “भूत-काळ” भवाने

स्त्री – हेल्लो कोण बोलताय ?

बंडू – मी बंडू बोलतोय … सर आहेत का ???

स्त्री – सर वारले आहेत … पण तू किती वेळा फोन करून हेच विचारतोस ???

बंडू – ऐकायला बरे वाटते ओ

funny marathi jokes for whatsapp

अमिताभ:- हम जहासे खडे होते है, लाईन वही से शुरू होती है.
+
+
+
दादा कोंडके:- काय तुझा बाप रोकेल ची गाडी चालवायचा कि काय..?

पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते.
. .
. .
पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते
.
.
.
चंद्र म्हणाला

मग कशाला मरायला सूर्याभोवती फिरते !

पुण्याच्या गर्लफ्रेंड ला बर्थडे गिफ्ट काय द्यावे!!!!
.
.
.
.
.
4-5 स्कार्फ द्या….आनंदाने उड्या मारेन

रिकाम्या जागा भरा
शिक्षक : (बाळूला)
रिकाम्या जागी योग्य शब्दभर
काचेच्या घरात
राहणार्यांनी… …………… .

बाळू : लाईट बंद करून कपडे
बदलावे……

दया : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये ?
वैभव : काल यार बायकोने वीस हजार
साड्यांवर उडवलेत….
दया :😂😂 मग आज मूड ऑन कसा…
? वैभव : आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला
दाखवायला गेलीय…..!!

Assal Marathi Jokes

STATE BANK OF INDIA आणि LIC चे joint venture…
..
.
.
….
SBI…..
रांगेत शेवटपर्यंत ” टिकलात ” तर पैसे ” आम्ही ” देऊ..
LIC…..
नाही ” टिकलात ” तर ” आम्ही ” देऊ..

खानदेशचे पती पत्नी मधील हे प्रेमळ संवाद …………. आमच्या पुढे जे ताटात येईल ते आम्ही जेवतो बाबा ……… पण इथे हे लाड बघा ………..

नवरा :- जेवाले काय बनावशी ?
बायको :- तुम्ही सांगश्यात ते बनावसू….. !

नवरा :- कर, वरण भात पोया…
बायको :- ते ते कालदिनच करेल व्हतं …

नवरा :- बेसण कर तावावरलं…
बायको :- पोरे खातस नई ना ते…

नवरा :- वटाणास्नी चटणी कर…
बायको :- ती पचाले जड जास…

नवरा :- तुले जे आवडस व्हई ते बानाव …
बायको :- तुम्हीच सांगा ना, तुम्ही सांगश्यात ते बनावसू मी !

नवरा :- आंडा कर मंग…
बायको :- काही वाटस का, सोम्मार शे आज…

नवरा :- आरे हा, धिंडरा कर मंग…
बायको :- त्यासना भलता कुटाणा पुरस…

नवरा :- तोरनी दायन्या चिखल्या बनाव..
बायको :- तोरनी दाय ते कालदिनच सरनी…

नवरा :- मंग मॅगी बनाई टाक…
बायको :- हाट, ते का जेवण शे का?

नवरा :- मंग काय बनावशी…
बायको :- तुम्ही सांगश्यात ते…

नवरा :- आसं, कर खिचडीच बनाई टाक …
बायको :- नको ,नुसती खिचडी खाई खाई कटाया येत नही का?

 Assal Marathi Jokes

नवरा :- काय बनावशी मंग
बायको :- त्येच ते सांगी राहिनू, तुम्ही सांगश्यात ते बनावसू…

नवरा :- आसं कर, आपण जेवाले बाहेर जाऊत….
बायको :- नको, बाहेरनं खाईसन भलता त्रास व्हस तुभ्हले….

नवरा :- (नवरा मन् मा नी मन् मा, इनी मायनी भूखे भूखे मारी की काय आज?..)
बायको : फोनवर : काय व्हयनं ? काहीतर बोला,

नवरा :- शांत…
बायको :- (मन् मा नी मन् मा फोन कट व्हयना की काय? …..)

नवरा :- दख, तुले जे पटी ते बनाव
बायको :- सांगा ना, तुम्ही सांगश्यात ते बनावसू…

नवरा :- घरमा दुध शे का ? पाव बिव खाऊत त्याना बरोबर….
बायको :- तुम्ही ते कायभी सांगतस पावसवर काय पोट भरस?

नवरा :- नुसता भात बनाव मी येवाना टाईमले दही लई येस…
बायको :- नको, दहीनी सर्दी व्हस तुम्हले…….

नवरा :- मंग पोरेसले जे आवडस व्हई ते बनाव…
बायको :- पोरे ते कायभी सांगतीन, तो काय खे शे का?

नवरा :- आते तूच दख, तुले पटी ते बनाव, मनी आक्का……….
बायको :- आसं नका, तुम्हीच सांगा ना, तुम्ह�

Assal Marathi Jokes

भारतात
ज्ञान वाटणा-या
महान टाँप ४ युनिवर्सीटी..
१. WhatsApp

२. पानटपरी
३. कटिंगचं दुकान
४. दारू पीलेला माणुस..
बाकी शाळा वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे

Marathi chavat Jokes

मास्तर: काय रे पप्या , गण्या आज उशीर का
झाला तुम्हाला..?
.
गण्या : गुरुजी काल रात्री
स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो,
तिथून यायला उशीर झाला..
.
मास्तर: आणि पप्या तुला का रे उशीर झाला ??
.
पप्या : गुरुजी, मी गण्याला
आणायला एअरपोर्ट वर गेलेलो…
खुप धुतले राव मस्तरन

आयला… नाव एवढा ख़राब झालाय की…

उपवासाला चिवडा-वेफर आणायला गेलो तरी दुकानदार विचारतो…

आजतरी उपवास धरा।।।

Marathi chavat Jokes

गोल्या : गण्या मले सांग,उत्तरपत्रिकेत सर्वात
अगोदर काय लिहू बे…????😳😳😳
गण्या : लिही कि,”या उत्तर पत्रिकेत लिहीलेली
सर्व उत्तरे काल्पनिक आहेत,यांचा
कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध
नाही आणि जर काही संबंध आढळून
आलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा… “

लग्नात कुवारे…

आणी

अंतयात्रेत म्हातारे…
.
सर्वात जास्त का जातात कारण…
.
.
दोघांना एकाच गोष्टींची चिंता असते…
.
.
.
.
.
.
मी नाही जाणार तर,
माझ्या वेळी कोण येणार… !!!

Marathi chavat Jokes

फुलटू आगरी इश्टाईल !

देवराम: ए बाला इक्र य.
वेटर : क पाजे क तुला?
देवराम : १ काॅपी कितीला ह ?
वेटर : २० रुपे
देवराम : तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क एरा समजतं क ?
वेटर : डोका फोरु तुजा डोका फोरु.. ते झेरॉकचं दुकान हाय.

बायकोत आणि सूर्यात काय साम्य आहे?
.
.
.
.
.
.
.
.
.
कितीही प्रयत्न केला तरी , आपण या दोघांकडे रागाने आणि एकटक पाहूच शकत नाही !

बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…
बाबा:-ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..

Marathi chavat Jokes

पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले, ” पक्या परिक्षेची तयारी झाली का ?”

पक्या : होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकि आहे.”

एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते….!!!

लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!

१० लाख..!!

१२ लाख..!!

१५ लाख..!!

गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का…??”

विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो…!!!

गोलू: २० लाख…!!!

मराठी विनोद

बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटीमोठ्याने म्हणाला
.
.
.
.
… .
.
.
.
.
“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. .
.
.
.
.
.
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत,
.
त्यांच काय झाल ?

मराठी चावट विनोद

एकदा एक लग्नाळू मुलगा मुलगी पाहण्यासाठी जातो.

प्राथमिक सोपस्कार (म्हणजे खोटे खोटे स्वागत ,चहापाणी , कांदेपोहे ईत्यादी इत्यादी) पार पडल्यानंतर मुला मुलीला थेट बोलायची संधी मिळते.

नव्या जमान्याप्रमाणे मुलगी जरा फॉरवर्ड असते तीच संभाषणाला सुरूवात करते.

मुलगी : तुला काय येते?

मुलगा : मला घाम येतो !
तुला काय येते?

मुलगी : मला गाता येते !

मुलगा : मग गाऊन दाखव.

मुलगी : गाऊन तर बाहेर वाळत घातला आहे .

मुलगा : मग असूदे, वाळू दे!

ह्यावर ती मुलगी बाहेर जाते व मुठभर वाळू घेऊन येते.
.
पुढे काय,असे विचारताय?

मुलगा शॉक्स……… मुलगी रॉक्स !!!

एकदा एक मारवाडी रेल्वेने प्रवास करत होता. गाडीत त्याच्या समोर एक चिनी माणुस येऊन बसला. काही वेळाने त्या चिनी माणसाला एक डास चावायला लागला. त्याने तो डास मारला व खाऊन टाकला.

थोड्या वेळाने त्या मारवाडी माणसाच्या हातावर पण एक डास बसला. मारवाड्याने तो डास पकडला व त्या चिनी माणसाला विचारले,” विकत घेतोस का ?”

मराठी चावट विनोद

स्थळ : शाळा

वर्ग : एकदम गप्प

कारण : इन्स्पेक्शन

अधिकारी : बोल अफ़ज़लखानाचा खून कोनी केला ?

बन्डु : माफ़ करा सर, मला काही माहित नाही.मी काल शाळेतच आलो नव्हतो . मला तर हा अफ़ज़लखान कोन आहे हे सुद्धा माहित नाही .

अधिकारी : काय सर ! हे काय चाल्ले आहे. मुल्लान्ना काहिच माहित नाहिये.

सर : नाही साहेब, बन्डु तसा खोड्कर आहे पण कोनाचा खून काही तो करणार्‍या मधला नाहीये.
अधिकारी : काय ! मुख्याध्यापकाना बोलवा.

अधिकारी : महाशय ! आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना काहीच माहित नाही.

मुख्याध्यापक : माझ्या शाळेतील विद्यार्थी असे कधी करणारच नाही.मी ह्याची खात्री देतो.

अधिकारी : तुम्ही खरोखरच मुख्याध्यापक आहात काय ? सर तुम्ही रोज विद्यार्थ्यान्ची हजेरी घेता काय ? काय रे बन्डु! तू रोज शाळेत येतोस काय?

बन्डु : माफ़ करा सर, मी शाळेच्या बाहेर केळी विकतो. ह्या वर्गातला एक विद्यार्थी आज भारत- औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे जबरदस्तीने पाठविले आहे.

सर : माफ़ करा सर, मी समोर पान टपरी चालवितो. ह्या वर्गाचे सर आज भारत-औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेले आहेत. त्यान्नीच मला इथे पाठविले आहे.

मुख्याध्यापक : माफ़ करा सर, मी मुख्यध्यापकान्चा भाऊ आहे. तो आज भारत औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे पाठविले आहे.

अधिकारी(हताश होवुन) : अरे बापरे ! मी आलोय तर ही अवस्था आहे.खरे साहेब आले असतेतर काय झाले असते देव जाणे??

मराठी चावट विनोद

एकदा रजनीकांत ने सचिन ला बोलिंग केली ,
त्या दिवसापासून रजनीकांत ला जाणीव झाली
आपण एक मनुष्य आहोत …
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रिकेट मध्ये एकच देव आहे ….सचिन…

Jokes in Marathi

दोन बायका एका बस मधे जागेवरुन भांडत होत्या. बराच वेळानंतर कंडक्टर आला व म्हणाला,” तुमच्या पैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल.”

आणि ती एक सीट रिकामीच राहिली !

काळू : माझे स्वप्न आहे मी माझ्या वडिलांसारखच महिन्याला ५००००० रुपये कमवावेत.

बाळू : तुझे बाबा महिन्याला ५००००० रुपये कमावतात ?

काळू : नाही रे, त्यांचही स्वप्न आहे कि महिन्याला ५००००० रुपये कमवावेत !

छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,
“काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची cream आहे का ?”
दुकानदार -” हो आहे ना…”
मुलगी – “मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते !!!”

Jokes in Marathi

शेवंताबाईंसोबत लग्न झाल्या दिवसा पासुन बळवंतराव बायकोच्या स्वभावामुळे जीवनाला कंटाळले होते. रोज रोजच्या भांडणापासुन मुक्ती मिळावी या विचाराने ते एक दिवस भांडण चालू असतानाच तडक बाजारात गेले व विषाची बाटली घेऊन आले.

बायको काही ऎकत नाही हे बघुन त्यांनी बाटली फोडली व गटागटा विष पिऊन झोपले. त्यांना वाटले झोपल्यावर विषाचा परिणाम लौकर होणार व त्रासही होणार नाही.

दोन तासांनी बळवंतरावांना जाग आली हे बघुन पुन्हा शेवंताबाईंनी आपली टकळी सुरु केली,”तुमच कोणतही कामा असच असते. आता बघाना आज विष आणल पण काही फायदा झाला का ? …………………………………”

बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ….?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?

बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला ………!

Jokes in Marathi

सर – homework का नाही केला?

मुलगा – सर लाईट गेले होते.

सर – मेणबत्ती लावायची मग..

मुलगा – काडेपेटी नव्हती.

सर – का?

मुलगा – देवघरात होती.

सर – घ्यायची मग.

मुलगा – अंघोळ नव्हती केली.

सर – का?

मुलगा – पाणी नव्हत.

सर – का?

मुलगा – मोटार चालू होत नव्हती.

सर – का?

मुलगा – आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून….

Jokes in Marathi

झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता?

मुलगी : एम. जी. रोड

झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता……!!!

विनोद खुप झाले. आज चला डोक चालवूया !

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.

बिल आले ७५ रुपये.

तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला दिले.

मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले.

…वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन , तिघांना १, १, १ रुपया परत दिला.

… म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले
मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४
मग १ रुपया कुठे गेला ???

मराठी विनोद

जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला

नसता… कारण बायकोने विचारले असते…

कुठे चाललात?

कोणा बरोबर?

कसे जाणार?

… काय शोधायला जाताय?

इकडे मिळणार नाही का?

नेहमी तुम्हीच का?

मी इथे एकटी काय करू?

मी पण येऊ का?

कोलंबस: जाउ दे नाही जात…

मराठी विनोद

जनगणने साठी प्रगणक घरी आल्यावर सुरेखाबाईंनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पण स्वत:चे वय काही केल्या सांगेनात.
तेंव्हा प्रगणक म्हणाला,” अहो बाई असे काय करता. तुम्हाला तुमचे वय सांगावेच लागेल.”

सुरेखाबाई,” त्या शेजारच्या कावळे बाईनी आपले वय सांगीतले का ?”

प्रगणक,” होय.”

सुरेखाबाई,”तर लिहून टाका ना तेवढेच.”

आणि प्रगणकाने सुरेखाबाईंचे वय लिहीले “कावळ्या ईतके “

नविन नवरा व नविन कुत्रा यात काय फरक आहे ?

नविन कुत्रा एका वर्षाने पण तुमच्याकडे बघुन आनंद दाखवतो…….. !

मराठी विनोद

डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे.

तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे.

पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ?

डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ?

पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.

बायको : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.

नवरा : नाही ग.

बायको : हो, मी ऎकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.

नवरा : तुझा गैरसमज आहे.

बायको : काय, कोणता गैरसमज ?

नवरा : मी झोपलो होतो.

marathi funny jokes

सरदार सांतासिंग ज्योतिषाला :माझे लग्न कधी होणार ?”

ज्योतिषी : तुझ्या नशिबात लग्नाचा योग नाही.”

सांता : कां ?

ज्योतिषी : अरे तुझ्या नशिबात अपार सुख लिहीलय !

आंधळा भिकारी : सुंदरी, मला ५ रुपये दे ना. काल पासुन उपाशी आहे.

बाईचा नवरा भिकार्‍याला १० रुपये देतो.

बाई : अहो हे काय त्याने पाच रुपये मागितले होते ना ?

नवरा : अग तो खरच आंधळा आहे. त्याने तुला सुंदरी म्हटले !

Jokes Marathi

नानासाहेब आपल्या बायकोला घेऊन दात काढायला डॉक्टर कडे गेले.
नानासाहेब,”डॉक्टर, दाता काढायला किती खर्च येतो हो ?”
डॉक्टर,”एक दात काढायला साधारण १००० रुपये लागतात.”
नानासाहेब,”एक हजार जरा जास्तच वाटतात.”
डॉक्टर,”होय ऍनेस्थेशिया द्यायचे ५०० व दात काढायचे ५०० होतात.”
नानासाहेब,”अजुन कमी होतात का बघाना ?”
डॉक्टर,”ऍनेस्थेशिया न देता माझा एक विद्यार्थी हातोडिच्या सहायाने २०० रुपयात दात पाडुन देतो, चालेल ?”
नानासाहेब बायकोकडे हात दाखवून,”हिचे दात काढायचे होते.”

सर – homework का नाही केला?

मुलगा – सर लाईट गेले होते.

सर – मेणबत्ती लावायची मग..

मुलगा – काडेपेटी नव्हती.

सर – का?

मुलगा – देवघरात होती.

सर – घ्यायची मग.

मुलगा – अंघोळ नव्हती केली.

सर – का?

मुलगा – पाणी नव्हत.

सर – का?

मुलगा – मोटार चालू होत नव्हती.

सर – का?

मुलगा – आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून….

Marathi funny jokes

खमक्या मालतीबाई पेंटर पुढे बसल्या होत्या व पेंटर त्यांचे चित्र काढत होता. मधेच त्या पेंटरला म्हणाल्या ,”हे बघा, माझ्या चित्रात छान हिर्‍याची अंगठी, सुंदर नेक्लेस, अप्रतीम सुंदर मंगळसुत्र व अजुन काही दागीने दाखवता अलेत तर दाखवा.”

“पण तुम्ही यातल कहिच घातलेल नाही.” पेंटर म्हणाला.

मालतीबाई,” तरिही दाखवा. मला माहितेय मी मेल्यावर हे नक्किच दुसर लग्न करणार तेंव्हा माझा हा फोटो बघुन ती यांना सुखाने जगु देणार नाही.”

एका शिशू वर्गात एकदा बाईंनी मुलांना सांगितल, तुम्हाला आवडेल ते चित्र काढा.

सर्व मुलांनी लगेच दिलेल्या कागदांवर चित्रे काढायला सुरुवात केली.

थोड्या वेळाने वर्गात चक्कर मारताना बाईंनी एका मुलीचे चित्र बघितले व विचारले हे काय काढते आहेस तु ?

मुलगी,”बाई मी देवाचे चित्र काढते आहे.”

बाई,”पण देव कसा असतो हे कुणालाच माहित नाही.”

मुलगी,” थोड थांबा मी चित्र काढल्यावर कळेलच देव कसा असतो ते. “

Marathi funny jokes

वत्सलाकाकू वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रथमच विमान प्रवास करित होत्या. त्यामुळे त्या बर्‍याच अस्वस्थ होत्या. विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या,”अरे मला सुखरुप परत उतरवशिल ना ?”

पायलट म्हणाला, “खर सांगु का आजी. मी पंधरा वर्षे विमान चालवत आहे. पण अजुन कुणाला आकाशात सोडून आलो नाही.”

वत्सलाबाईंनी बबनरावांना विचारले,” आज रात्री जेवायला काय करु ?”
बबनराव, “छान कांद्याचे थालीपीठ करतेस का ?”

वत्सलाबाई, “हो करते, बरेच दिवसात केले नाहित ना ?”

वत्सलाबाई स्वयंपाक घरात गेल्यावर थोड्या वेळाने बबनराव पण तिकडे गेले.

अग अग कांदा बारिक चिरलास ना ? आणि हो त्यात थोडे तिळ पण घाल. आणि ऎकल का मोहन जरा जास्तच घाल थालीपीठ छान खुसखुशीत होतात. तव्यावर पण थोडे तेल जास्त लाव बर का .

वत्सलाबाई चिडल्या व म्हणाल्या मला काय थालीपीठ येत नाहित काय ?

मला काय कार चालवता नाही येत का ?

Marathi funny jokes

दोन महिन्यांपुर्वी आमच्या कंपनीत एक नविन साहेब आले. त्यांना ऑफिसचे प्रत्येक काम आपल्या सेक्रेटरीला सांगायची सवय असल्यामुळे कोणतीही मशिन चालवता येत नाही.
परवा त्यांची सेक्रेटरी रजेवर होती व मला ते संध्याकाळी पेपरचे बारिक तुकडे करणार्‍या पेपर श्रेडर पुढे ऊभे दिसले. त्यांना बघुन मी विचारल ,”सर, काही मदत हविय का ?”

साहेब : हो, मला ही मशिन चालवता येत नाही. जरा मदत कर ना.

मी त्यांच्या हातातला कागद घेतला, मशिन मध्ये घातला व स्टार्ट बटन दाबली. बटन दाबताच कागद आत गेला.

कागद आत गेलेला बघुन साहेब मला म्हणाले,” अरे, हा एक अतिशय महत्वाचा कागद आहे मला याच्या दोन कॉपी दे”

सांता : अरे बांता इतके दिवस कुठे गेला होतास ?

बांता : अरे मी श्रमदान करायला गेलो होते.

सांता : श्रमदान ? कुठे ?

बांता : जेल मधे . अरे मला सहा महिने सश्रम कारावास झाला होता ना.

Marathi funny jokes

“तु माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का ?” मंगेश.

साधना,”मी तुला या अगोदरच सांगितले आहे. मी तयार नाही.”

“मी दोन दिवस वाट बघतो. अन्यथा मी विहार लेक मधिल बर्फात मधोमध एक भोक करणार व त्यात स्वत:ला बुडवून घेणार.” मंगेश.

साधना,”अरे, मुंबईत इतकी थंडी कधिच नसते कि विहार लेक मधिल पाण्याच बर्फ होईल.”

“तर मी अशी थंडी पडायची वाट बघणार.”

राजू : अरे विजू, तुला कधि कोणी मुर्ख भेटलाय ?

विजू : मी खुप प्रयत्न केला पण आज तुला टाळू शकलो नाही.

काल, एका माणसाने दोन किलो कांदे आणले.

आज : त्याच्या घरावर आयकर अधिकार्‍यांनी धाड घातली. इतके पैसे कुठून आणले हे बघायला !

आम्ही जेंव्हा लहान होतो तेंव्हा आम्हाला मोठ्यांचा आदर करण्यास सांगण्यात आले.

आता मोठे झाल्यावर आम्हाला तरुणांच ऎकाव अस सांगतात.

याला म्हणतात नशिब.


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , Marathi Jokes | सर्वोत्तम विनोद New Marathi Funny Jokes sms status हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


 

Leave a Comment