पुणेरी पाट्या | Puneri Patya

MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज Puneri Patya for office, Puneri patya in marathi latest, Puneri Patya website, Puneri patya comedy, Puneri patya about food, Famous Puneri Patya, Puneri patya Hotel या पुणेरी पाट्या मिळतील. तुमच्या मित्रांना शेयर करा.

Puneri Patya | ट्रॅफिक सिग्नल ,उद्याने ठिकाणचे पाट्या

अनोळखी वस्तूस स्पर्श करू नये (व्यक्तीसह).

आपल्यामुळे इतरांना त्रास झाला तर इतरांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.

शहाण्या कुत्र्याला, वेड्या माणसाने, उद्याने व मंदिर परिसरात आणू नये.

मनुष्याची सर्दी आणि पुण्याची गर्दी, सकाळी जामच असते.

शापित पार्किंग क्षेत्र, गाडी आपोआप गायब होते, विश्वास नसल्यास तसा प्रयत्न करावा.

कितीही हॉर्न वाजवला तरी लाल सिग्नल जेव्हा व्हायचा तेव्हाच हिरवा होतो, तुमच्या प्रेशर खाली येऊन रंग बदलायला तो बाबू नाही.

आम्ही रस्त्यात मुक्काम करत नाही, कृपया हॉर्न वाजवू नये.

प्रत्त्येक विषयात तुम्हाला स्वतःचे मत नसेल तर या शहरात प्रवेश नाही.

प्रेमी युगुल्लानी उद्यानात वेगळे चाळे करू नये, केल्यास दोघांची आधार कार्ड जप्त केले जाईल.

प्रेम जर आंधळच असेल तर, तिला मी सापडणार कसा, पटल तर घ्या !

येथे गाडी लावल्यास गाडीला घोडा लागेल.

फोनवर बोलत गाडी चालवू नका, फोन खाली पडण्याचा धोका असतो.

दुकान बाहेरील पाट्या

लिंबाचा वापर दोन गोष्टींसाठी, उतरून टाकायला आणि उतरवायला.

तुम्ही दारू पिता का ? हा प्रश्न आहे कि आमंत्रण

माझा मित्र मला रोज चहा पाजतो पण बिल मात्र मीच देतो.

चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हा लागतोच.

मी उपवास करत नाही कारण जास्त खायला मला आवडत नाही.

जे जे फुकट …………………..ते ते पौष्ठिक..

हे पण वाचा 👇🏻

मराठी टोमणे

उधारी ठेवल्याने ओळखी वाढतात

लॉग इन करण्यापूर्वी आपल्या खिशात पैसे असल्याची खात्री करा, नंतर कारणे देऊ नये.

येथे हापूस चे भाव फिक्स आहेत, घासाघीस करू नये, अन्यथा पायरी दाखविण्यात येईल.

कृपया कोणत्याही प्रकारचे आवाज न काढता येथे फक्त हात धुवावे व चूळ भरावी.

झेरॉक्स, डोळ्याची पापणी उघडण्याच्या आत काढून मिळेल.

येथे बसून पान खाऊन थुंकणाऱ्याचे गाल लाल केले जातील.

फोटो खराब आल्यास वडिलांना जाब विचारावा आम्हास नाही.

दुकाने बंद असले तरी येथे वाहने लावू नये, हवा सोडली जाईल.

गरम वडापावाने तोंड भाजले तरी आम्ही पैसे पूर्णच घेतो.

दुकानासमोर गाडी लावू नये, हा पोस्टर फाडणाऱ्याचे वाटोळे होईल.

चहाची वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो.

सिगारेट बशी मध्ये विझवू नये, नाहीतर चहा ऍशट्रे मध्ये प्यावा लागेल.

आम्ही चुना फक्त आमच्या पानाला लावतो, दुसऱ्यांना लावायचा चुना आम्ही विकत नाही

येथे हिंदी, इंग्रजी, मराठी झेरॉक्स मिळेल.

कृपया सुटे पैसे देणे, अन्यथा चोकलेट शिवाय पर्याय नाही.

आपल्याला कोणत्या भाज्या आवडतात, ते आम्हाला माहित नसते, ताटावर बसण्याआधी मेनू माहित करून घेणे.

आमच्याकडे आमरस आंब्याचाच मिळतो.

ताटात अन्न न टाकल्यास जेवणाच्या बिलावर २०% सवलत दिली जाईल.

एक मिसळ दोघात खाऊ नये अन्यथा दोन मिसळ चे पैसे घेण्यात येईल.

बिगर बर्फ रस घेतल्यावर, बर्फ मिळणार नाही.

पाच वेळा Ctrl + S दाबले तरी Save एकदाच होते.

येथे दारू पियुन बसू व झोपू नये, दिसल्यास पाणी ओतून, दोन कानाखाली मारुन, ५०० रु दंड घेऊन,पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल.

उसाचा रस मिळेल, अमिताभ १५ रु, जया १० रु.

घराबाहेरील पाट्या

घरात धूर करून इतर लोकांना त्याचा त्रास झाल्यास धूर काढणाऱ्याच्या मागून धूर काढला जाईल.

मासे आणि पाहुणे कितीही चांगले असले तरी त्यांचा दुसऱ्या दिवशी वास येतोच.

येथे वाडा पाडून बिल्डींग बांधायची नाही, असे आधीच ठरले आहे, असा प्रस्ताव घेऊन आल्यास वाड्यात डांबून पोकळ बांबूचे फटके देण्यात येतील.

हे आमचे फाटक आहे कुत्र्याच्या विधी जागा नाही, त्याला आपल्या घरी नेऊन विधी करायला लावा.

कुत्रा चावल्यास इन्जेक्षण चे पैसे मागायला येवू नये, आम्ही त्याला चावायला शिकवले नाही.

बिल्डींग रंगवण्याची जबाबदारी कुणालाही दिली नसून, ती जबाबदारी कृपया भिंतीवर थुंकून पार पडू नये.

कुत्रा चावल्यास इन्जेक्षण चे पैसे मागायला येवू नये, आम्ही त्याला चावायला शिकवले नाही.

बिल्डींग रंगवण्याची जबाबदारी कुणालाही दिली नसून, ती जबाबदारी कृपया भिंतीवर थुंकून पार पडू नये.

आम्ही मत कोणाला देणार हे ठरवले आहे, कृपया दार वाजवून त्रास देऊ नये.

आमच्या हक्काच आणि आमच्या बापाच, आम्ही काहीही सोडत नाही.

आमच्या मुलाचे लग्न आता ठरले आहे, कृपया स्थळे आणू नये.

घर रिकामे आहे चोरण्यासारखे काहीही नाही.विनाकारण कष्ट घेऊ नये.

रोज सकाळी उठल्यावर श्रीमंत आणि महान लोकांची यादी वाचा, त्यात स्वतःचे नाव नसेल तर, कामाला लागा.

दारावरची बेल वाजविल्यावर थोडी वाट पाहायला शिका, घरात माणसे राहतात स्पायडरम्यान नाही !

भविष्य सांगणारे जोशी आम्ही नाही !

बायकोचा राग आला तर तो गीळा… नाहीतर गिळायला मिळणार नाही !

एकदा या घरी, याचा अर्थ एकदाच घरी या !

बेलसाठी लागणाऱ्या विजेचे पैसे आम्ही भरतो एकदाच वाजवा !

येथे पार्किंग करू नये अन्यथा तुमच्या डोक्यात गेलेली आणि चाकातील दोन्ही हवा काढण्यात येईल.

बाहेरील लोकांनी लिफ्ट वापरू नये, अडकल्यास सोसायटी जबाबदार नाही.

मांजर आणि नवरा कुठेही नेऊन सोडला तरी संध्याकाळी तो घरीच येतो.

गरज कमी असणे हीच आजची गरज आहे.

मुलांच्या वाईट कामगिरीला, पालक ‘पराक्रम’ का म्हणतात?

हुशार बायको पाहिजे, हुशारी करणारी नको.

अनुभव फक्त एकाच ठिकाणी विचारला जात नाही,………लग्नात.

चांगल काम केल कि नाव होते, आणि च्नागले नाव केले कि लगेच काम होते.

मी मांसाहारी नाही, पण हॉटेलात गेल्यावर मित्रांना कापतो…

बायको सुंदर आणि हुशार असावी असे प्रत्येकाला वाटते पण दोन लग्न करणे हा गुन्हा आहे.

सून आणि मान्सून यांची लोक आतुरतेने वाट पाहतात आणि थोड्याच दिवसात कंटाळून चिडचिड करतात.

आपण मुलांना लहानपणी बोला चालायला शिकवतो आणि नंतर ……..एका जागी शांत बसायला.

बँकेतील पाट्या

आम्हाला काका म्हणू नये, आम्ही कुणाच्याही बारष्याला जेवलो नाहीत.

सर्वांच्या नोटा दिसायला सारख्याच असतात, तुझी बघू … तुझी बघू करत विनाकारण वेळ काढू नये.

आमच्याकडे ज्या नोटा अव्हेलेबल आहेत त्याच देऊ शकतो, आमचा स्वतःचा नोटा छापायचा कारखाना नाही.

घाई करू नये, हि बँक आहे लोकल नाही.

फॉर्म निट भरा, दादा काका, साहेब यांना आम्ही ओळखत नाही कारण आत्ता आम्ही बाप आहोत.

हि कुणाच्या तीर्थरूपांची बँक नाहीये कृपया आवाज चढवू नये.

गर्दी असल्याने सारखे पिचिक पिचिक आवाज काढू नये, घरी पैसे साठवायला आम्ही सांगितले नव्हते.

अजून किती वेळ लागेल अशे प्रश्न विचारू नये, कारण त्याचे, उत्तर आम्हालाही माहित नाही.

तुमच्याबद्दल कोणाला फिकीर नाही अस वाटत असेल तर, बँकेचे दोन हप्ते चुकवून बघा.

नंतर बोलू चा अर्थ ……’चला निघा आता’

आपण किती शुद्र आहात याचा अंदाज येईल…….सरकारी कार्यालयात जा…

माझी नोकरी मला फार आवडते, आवडत नाही ते फक्त माझे काम.

स्वतःच्या चुकांमधून जो शिकतो तो शहाणा आणि ……..दुसर्यांच्या चौकातून चुकांमधून जो शिकतो तो दीडशहाणा

हॉस्पिटल पाट्या

टेन्शन मुले केस गळतात आणि केस गळल्याने टेन्शन येते.

छहुशार डॉक्टर अक्षरावरूनच ओळखा.

दारुड्याला औषध बाटलीतून द्यावे लवकर गुण येतो.

हे हॉस्पिटल वेड्यानकरिता असले तरी येथे काम करणारे शहाणेच आहेत.

कृपया चप्पल बूट बाहेर काढा, फरशीच्या थंडाव्याने ताजेतवाने व्हाल.

येथे थुंकू नये, थुंकल्यास परिणाम बिलात दिसेल.

दवाखान्यात डॉक्टर येईपर्यंत थांबा, फार घाई असेल तर सरळ वर गेला तरी चालेल (डॉक्टर वर राहतात)

आम्ही आजपर्यंत “बरेच” “जण” बरे केले आहेत.

आधुनिक पाट्या

ज्याला आपल्यापेक्षा आपली जास्त माहिती असते त्याला शेजारी असे म्हणतात

मी कुणाच्या बापाला घाबरत नाहीये………प्रेयसीच्या सोडून

वडील म्हणजे अनुवंशिकतेने मिळालेला फायनान्सर.

गोड नसलेले, आत काळे न निघणारे, चिप्स व वेफर्स होणारे चवदार तळेगाव बटाटे.

जोडप्यांसाठी सूचना, रिक्षामध्ये फालतू चाळे करू नये… केल तर आरशात दिसेल.

आपले वाहने कुलूप लाऊन बाहेर भिंती लगत ठेवावी.

कुंपणावरील पाटी, कुत्र्या येथे थुंकू नकोस.

झेरॉक्स १रु. कृपया दुसरीकडे काय भाव आहे आम्हास सांगू नका.

येथे थुंकण्यास सज्जनांनामनाई आहे मूर्खांना नाही.

मंगल कार्यालयाबाहेर, रस्त्यावर फटाके, बॉम्ब फोडण्यास मनाई आहे.

कुत्र्या व भुतांपासून सावध रहा.

निखळ यशासाठी, कष्ट is Must.

मस्तानी पार्सल मिळेल.

अनारसे संपले तर पुन्हा येणार नाही.

पार्किंग इमारतीच्या मागील बाजूस पुढील लेन मधून डाव्या बाजूस.

महाराष्ट्रीयन पद्धतीचे घरगुती जेवण, Lunch of Maharashtrian method.

हॉटेलबाहेर, कृपया गर्दीची वेळ निर्णय लवकर घ्या.

बोर्डावर भाव वाचा, नंतर पैसे देऊन कुपन घ्या, नंतर कुपन देऊन माल घ्या, धन्यवाद !

कृपया एका रुपयाचे नवीनच नाणे टाकावे, नसल्यास मागून घ्या.

श्री कामत यांच्याकडे येणाऱ्या लोकांनी आपली पादत्राणे कृपया आमच्या दारात ठेऊ नयेत.

आमचा राहुल यंदा दहावीत आहे त्याला खेळायला बोलवू नये.

स्विमिंग झाल्यानंतर कपडे घालून बाहेर यावे उघड्यावर येऊ नये

येथे कचरा टाकू नये, जो कचरा टाकेल त्याची आई टकली.

येथे बिनडोक लोकांनी कचरा टाकावा.

शून्याला खूप किंमत असते हे शून्यातून बाहेर आल्यावरच कळते.

इतिहास बदलता येत नसेल तर निमुटपणे अभ्यास करून पास व्हा.

आयुष्यात चार माणसे तरी जोडावीत, शेवटी उपयोगी पडतात.

पोट आणि इगो कमी असेल तर कोणालाही मिठी मारता येते.

मी कुणाच्या बापाला घाबरत नाहीये………प्रेयसीच्या सोडून

ज्याला आपल्यापेक्षा आपली जास्त माहिती असते त्याला शेजारी असे म्हणतात

तारुण्यात न घसरलेला पाय उतारवयात घसरतो …..बाथरूममध्ये

रक्ताऐवजी पित्त खवळते तेव्हा वय झाले असे समजा.

कुण्या एकाची कला चोराने म्हणजे गुन्हा आणि अनेकांची कला चोराने म्हणजे संशोधन.

खिसा रिकामा झाल्यवर मन खूप भरून येते.

कमीत कमी शब्दात जास्त भावना व्यक्त करणे म्हणजे ……….शिव्या.

एका हाताने टाळी वाजते ………..कानाखाली.

नकार देन हि कला असेल तर होकार देऊन काम न करणे हि खरी कला.

मित्रांची किमत महिनाखेरीलाच कळते.

सुंदर मुली बायकोच्या मैत्रिणी का असतात?

पावशेर टाकला कि अनेकजण सव्वाशेर का बनतात?

लग्न एक कार्यशाळा आहे, नवरा कार्य करतो आणि बायको शाळा घेते.

माणूस कितीही शहाणा झाला तर त्याला माकडच का म्हणतात?

सगळेच जवळचे असावेत नाहीतर गैरफायदा कुणाचा घेणार?

अस्सल पुणेरी पाट्या

मैत्रिणीचे लग्न झाले कि आपला मामा होतो……

लोकांना डोक्यावर घेऊ नका… मान लचकेल.

जनतेला लुटू नका… सरकारला स्पर्धक आवडत नाही.

ड्रायव्हर ची जांभई प्रवाशांची झोप उडवते…

कोण म्हणत व्यसन सुटत नाही…… मी आतापर्यंत शंभर वेळा सोडलय………

कोणत्याही गोष्टीत उचलण्यापेक्षा ढकलणे बरे असते, जबाबदारीच्या बाबतीत मी तेच करतो.

छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मना, उदा. पगार

एक पुणेकर
या पावसामुळे 🌧🌧🌧 परी हुं मै ! 🧚‍♀🧚‍♀🧚‍♀ रद्द होणार आणि घरी हुं मै ! 🏠🏠 होणार असं दिसतयं नवरात्रीमधे….

पुण्यातले नवरे
बायकोला घाबरणारे 😮 नवरे स्वर्गात जातात,
आणि
न घाबरणाऱ्यांकरिता इथेच स्वर्ग असतो!

पुणेरी नवरा
लग्नाआधी खूप आवडायचे तिचे केस त्याला, पण नंतर नावडते झाले कारण लग्नानंतर दुपारच्या डब्यात पण द्यायची एखादा.

पुणेरी प्रश्न
भाषा तज्ञा नी सांगावे!
पत्नीने भांडी घासून झाल्यावर पतीला चहा दिला..!
या वाक्यात भांडी कुणी घासली ?

वैतागलेला पुणेकर
डिग्री 🎓 संपवून नोकरी शोधत असताना समजते की,
🏛 university वाले
डिग्रीचे certificate सरळ न देता,
🗞 सूरळी करुन का देतात !!!

माझ्या शांत असण्याला माझा कमकुवत पणा समजू नका,

“मी मनातल्या मनात

लै शिव्या देत असतो.”

एक शांत पुणेकर…!!!

पुणेरी असामी
आजकाल लोकं अती संशयी झाले आहेत, लिहायला पेन मागितलं तर टोपण स्वतःजवळ ठेवून घेतात

असें बिना टोपणाचे माझ्याकडे 4/5 पेन जमले आहेत😃😃कुत्र्या व भुतांपासून सावध रहा.


MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, पुणेरी पाट्या | Puneri Patya हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻


 

Leave a Comment