MarathiStyle.com या वेबसाईटवर आपल्याला दररोज मराठी कविता प्रेमाच्या, मराठी कविता प्रेमाची चारोळी, सच्चा प्रेम कविता मराठी, मराठी प्रेम कविता संग्रह, मराठी कविता प्रेमाच्या आठवणी, marathi poem on love life, marathi prem kavita status, sms, message, marathi sad dukhi prem kavita charolya sms, marathi virah prem kavita, marathi language prem kavita sangrah, valentine’s day marathi prem kavita, प्रेम कविता मराठी शायरी, मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता, पति पत्नी प्रेम कविता मराठी.
Marathi Prem Kavita / Marathi Poem On Love
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते…♡♡माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते…♡♡तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते…♡♡कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते… ♡♡तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते…♡♡
मराठी कविता प्रेमाच्या
आभाळ जेव्हा भरूनयेत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
… मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ……
तुझ्या आठवणींची.. …..!!
हरवले होते ते स्वप्न माझे
जे तुझ्या रुपाने परत मिळाले,
रुसले होते ते प्रेम माझं
जे तुझ्या साथिने परत आले,
प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होतं
पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले,
तुच आहेस त्या स्वप्नाना जागवणारि,
तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारि,
रडत तर मि फक्त एका आठवणीनेच होतो
पण तुझ्या रुपाने ते परतुन आले–ते परतुन आले॥
तुझ्या साठी Facebook वर येत असतो
तुझ्या साठी मराठी कविता करत असतो
FRIEND भेटला की थोडा वेळ
Chatting करत असतो
सकाळ पासून संध्या काळ पर्यंत
ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता करत असतो
कधी ऑफिस चे काम
तर कधी क्लाइंट्स चे फ़ोन
किती ही कामात असलो
तरी Facebook वर
ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता
करत असतो…
हे पण वाचा 👇🏻
marathi love poems
तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही.
असे असावे प्रेम केवळ
शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम केवळ सावलीतच
नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम केवळ सुखातच
नव्हे तर दुखातही साथ देणारे.
नेहमीच विचारायची ती मला
का प्रेम करतो तू एवढं
सागराच्या खोली एवढं का ओढून घेतो मला
सागराच्या लाटा एवढं नेहमीच सांगायची ती मला
हिप्नोटाइज करतोस तू मला
स्वप्नातही माझ्या फक्त तूच का दिसतो मला
वाटायच सांगाव तिला अग वेडे
प्रेम काय सांगून केले जाते
बुडायला काय पाणीच लागतं
अथांग काय फक्त सागरच असतो
अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर
चंद्रही भारावतो ह्या लाटाना
म्हणूनच त्याही उफाणतात
पोर्णिमा आणि अमावस्येला
प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत
तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो
तुझ्या असण्यातच आता माझं असण असते
म्हणूच सांगतो
माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत
शृंगार
रोजच पाहतो तुझा चेहरा
आज वाटे नवीन काही
शृंगाराची खान तुझी
नजरेचा बाण घायाळ करी
कमरेवरचा हात तुझा
नजर झुकवित किंचित खाली
ओठावरती चमकते लाली
हा शृंगार कुणासाठी
नटली अशी जणू भासते नटी
उतावीळ झाला जीव
तुला भेटण्यासाठी
मधाळ तुझे ओठ
त्यावर ठेवून अलगद बोट
इशारा करशी मज काही
पैंजणांचा नाद मधुर
असा वाजतो तुझ्या पायी
चाल तुझी जणू चालली वाघीण
डुलते मान जशी डुलती नागिन
कुणास मि काय बोलू
नजरा तुझ्यावर हजार आहेत
शृंगाराची नशा तुझ्या
आज प्रत्येकाच्या नजरेत आहे
मराठी प्रेम कविता संग्रह
वेड मला लावुन तु शहाणी झालीस…प्रेम माझ्यावर करुन तुका दुसर्याची झालीस?नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतंतर का सुरुवात केलीस?जायचे होते सोडुन मला तरका माझ्या जीवनात आलीस?चुक झाली माझीचुक झाली माझी कि मी तुझ्यावर प्रेमकेले…सुख नाही तर नाही पनं हे दुःखतुमला का दिलेस?नको ढाळुस अश्रु आत्तानको ढाळुस अश्रु आत्ताऊत्तर दे माझ्या प्रश्नांना…बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणारतुझ्या खोट्टया अश्रुंना…आज रहाशील गप्पंआज रहाशील गप्पंतुझ्या कडे ऊत्तर नसताना…ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचंहसताना…
प्रेमाकडे घेऊन जाणारा मार्ग
खुपच अरुंद असतो
ज्याच्यावरुन दोघेजण
कधीच एकत्र चालू शकत नाही,
कारण त्यांना पुढे
चालण्यासाठी मनापासुन
एक होणे गरजेचे आहे.
सगळ्याच गोष्टी
सांगायच्या नसतात
त्या न सांगता समजतात
… … ज्या गोष्टी न सांगता
समजतात
अगं वेडे त्यालाचं तर
प्रेम म्हणतात
प्रेम हे जिवनासाठी आहे ,
पण जिवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जिवन प्रेमात असु शकत
नाही ,
प्रेमात जिवन वाया घालवू नका ,
पण जिवनात प्रेम करायला विसरु
नका
प्रेम करतो तुझ्यावर…
सोडून मला जाऊ नकोस… खुप स्वप्न बघितलित…..
तोडून कधी जाऊ नकोस…. कधी प्रेम करायचीस माझ्यावर…
हे कधी विसरु नकोस….. नको करूस प्रेम…
तिरस्कार मात्र करू नकोस… विसरलीस माझ प्रेम तरी चालेल….
मैत्री माझी विसरु नकोस….. सोडून गेलीस तू मला….
प्रेम माझ विसरु नकोस… मरणाच्या वाटेवर असताना…
कालजी माझी करू नकोस… मरण जरी आल मला….
मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस
marathi poem on love life
तुझ्या प्रेमाने
रडवलं आहे खुप,तुझ्या आठवणीने मला
तर सावरल आहे खुप..मी तुझ्यावर जिवा-
पाडप्रेम करत होतो,माझ्या या मजबुरीला तू
आजमावलं आहे खुप..दिली आहेसच तू मला
प्रेम भंगाची जखम,मग कशाला हवे आहे
तुझ्या आठवणींचे मलम..या धक्क्यातून सावरावं
लागणार आहे निश्चित,आता तुला विसरणं हेच
आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..
आठवणीत कधी जेव्हा मन
वेड हरवते
कोसळणाऱ्या पावसात मग
आसवांना लावपते
लपलेच प्रेम आणि न
विसरलेल्या आठवणी
ढगालेल तेच वातावर पण
कोसळत नाहीत
आता पुन्हा त्याच टपोर्या
थेंबाच्यासरी
वाहत राहता आता फक्त
त्याच वेड्या आठवणीच्या लहरी
व्हायचं ते होऊन गेलं घडायचं ते घडून गेलं,
कळत नाही कसं पण मन प्रेमात पडून गेलं,
कळलं नाही मलाही कधी हातून निसटून गेलं,
तू भेटलीस अन मला सोडून गेलं,
कधी तुझ्या डोळ्यांत मन हरवत गेलं,
कधी तुझ्या केसांत मन गुंतत गेलं,
विचारलं तेव्हा मनाला हे काय चाललं,
तुला काही कळत नाही इतकचं मला म्हटलं,
माझचं मन माझ्याकडे ढुंकूनही पहात नाही,
तू नाद लावलास त्याला आता ते माझं राहिलं नाही..
मनात दाटले भावनांचे धुके,
तुझ्या जिद्दीपुढे हरून,
माझे शब्दही झाले मुके….
marathi prem kavita status
एकांत क्षणी…कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर
व्हावं.
रेम करणं सोपं नसतं…
प्रेम करणं सोपं नसतं…
सर्व करतात, म्हणून
करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून
करायच नसतं…
पुस्तकात वाचलं , म्हणून
करायच नसतं….
तर कुणाकडून ऐकलं,
म्हणून करायच नसतं…
कारण प्रेम करणं सोपं नसतं…
मी दिवस संपण्याची वाट बघतो
कारण रात्री ओढ असते
मी रात्रीची वाट पाहतो
कारण रात्र स्वप्नांची असते
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस
मी तुझी वाट पाहातो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.
एक दिवस असा येयील तुला माझी उणीव भासेल ,
आणि जिथे पाहशील तिथे माझाच चेहरादिसेल …
येणारा प्रत्येक क्षण तुला गेल्या क्षणाची आठवण करून देयील , आणि मला झालेल्या दुखाची तुला जाणीवहोयील …
तुझे डोळे सतत माझ्या वाटेकडे पाहतील ,
आणि वाटेवर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत
तुझे अश्रू हि वाहतील …..
तुझा तो उदास चेहरा पाहून तेव्हा तू रडशील , आणि जेथे पाहशील तेथे माझाच
चेहरादिसेल …..
पण……पण….. …
ज्या वेळी तुझे मन माझ्याकडे धावेल
तेव्हा कदाचित मी या जगात नसेल…
prem kavita in marathi
प्रेम हे असच असत….
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत…
उमगल तरी समजत… नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत…
… प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहितअसते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात…?
प्रेम हे सांगून होत नसत…
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूकधागा असतो…
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांनाऐकवणारा एक भाव असतो…
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते…
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ….
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.
अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव…
..
तिने हळूच माझ्याकडे बघाव ,
मी बघतांना तिने हळूच लाजाव… .
.भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव…
. मी दिसताच तिने मग हळूचहसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव …
..
तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव… .
.तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव
निघाव ,स्वप्नातही तिला मीच दिसावं….
. .अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव…♥
प्रेम हृदयातील एक भावना..
कुणाला कळलेली..
कुणाला कळून न कळलेली..
कुणी पहिल्याच भेटीत
उघड केलेली..
तर कुणी आयुष्यभर लपवलेली…
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली..
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी..
फक्त एक भावना.
marathi dukhi prem kavita
ती खूप गोड हसते,
कि हसताना ती खूप
गोड दिसते…ह्यातला फरक मला
कधीच कळत नाही…ती हसताना,
मी फक्त तिच्याच
चेहऱ्याकडे पाहत बसतो…कारण,
हसताना तिचा
चेहरा असा खुलतो,जशी गुलाबाची
एक काळी फुलते…जशी गुलाबाची
एक काळी फुलते…
प्रेम करतोस ना तिच्यावर,मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव,
तिने ही कराव प्रेम म्हणून आणायचा नसतो दबाव….
असेल तिचा नकार, तर तो हि तू हसत स्विकार,
तिलाही आहे ना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार…
नाही म्हणाली तर तूझ्या प्रेमाने नकाराला होकारात बदल,
का नाही म्हणाली याचा विचार करुन आधी स्वत:ला बदल…
नाही म्हणाली तर तिच्या नकारावरही प्रेम कराव,
नाही म्हणता म्हणता तिला प्रेम करायला शिकवाव…
नको रे घेउस तूझ्या वेड्या हट्टा पाई तिचा बळी,
काय मिळणार तूला तोडून एखादी उमलणारी कळी…
खरे प्रेम करतोस ना, मग ठेव सच्ची निती,
कशाला दाखवतोस उगाच
तिला जिवाचि भिती…तूझे हे सच्चे रुप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार, तिलाही होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार…अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तूही घे अवश्य माघार, कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार…
marathi sad prem kavita
चातका सारखी वाट
पाहतॊय मी धुंद पावसाळ्या
सारखा एकदाच ये तू…प्रेमाची धुंदी हवीय सारी,
तो कैफ जुना पुन्हा एकदा
चढवायला ये तू सात जन्मच
प्रेम माझ हक्काच,या एकाच जन्मात
भरभरून द्यायला ये तू…प्राजक्त फुललाय फांदी वर
ह्या सुगंधाच दान पदरात
त्याच्या टाकायला ये तू…बाग हि बह्र्लीय अशी थंडीत
ही दाणा हिच्या कणसाचा
घ्यायला ये तू…सुगंधाच काय…
बहर सारा तुझाच आहे,
तो लुटायला ये तू…
दोघांचा आहे प्रवास सगळा
पावल माझ्या पावलांशी
जुळवायला ये तू…माझा शब्दन शब्द तुझाच आहे,
कविता आहे तुझ्याचसाठी,
हि वाचायला ये तु
एक गरीब प्रियकर त्याच्या
श्रीमंत प्रेयसीला म्हणतो…जर मी अजून गरीब झालो
तरी तू मला स्वीकारशील..?श्रीमंत प्रेयसी – मी
तुझ्यासाठीच बनली आहे..!!गरीब प्रियकर – जर कोणी
श्रीमंत मुलगा आला आणि
त्याने तुला लग्नासाठी मागणी
घातली तर..??श्रीमंत प्रेयसी – मला खात्री
आहे कि तो तूच असशील..!!
marathi prem kavita charolya sms
आजकाल सारं जग प्रेमात Busy असते,
तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते.
आज काल फक्त नजरांनी Setting असते,
मग थोड्याच दिवसात थेठ Meeting असते,
तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते.
मग तासन तास एकमेकांना Calling असते,
Long long एकत्र Walking असते.
आधीफक्त Hi, Bye असते,
मग I Love You, I Miss You आणि काय काय असते,
तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते,
मग रोज आई वडिलांशी Cheating असते,
फी च्या नावाखाली एकमेकांना Gift आणि Greetings असते.
रोज रोज मग एवढेच Routing असते आणिBike वरून दूर दूर
Riding असते,
तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते.
तेच तेच एके दिवशी मात्र Over वाटते,
मग हळू हळू एकमेकांना Ignore असते.
आधीघट्ट अशी Attachment असते,
नंतर मात्र डोक्याला Harrashment वाटते,
तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते,
आधी काय झाल?काळजी घे, अस मिनटा मिनटाला असते.
नंतर मात्र हेच सगळ Boaring boaring असते.
आणिमग शेवटी…..
माझ्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आल आहे,
Please मलातू विसरून जा हे म्हणणं खूप Easy असते,
आणि खरच तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते.
आजकाल प्रेम म्हणजे फक्त Timepass असते.
दुसरे काही नसते..
Cute प्रेमाचा Sweet गोलमाल
♥ जेव्हा तुम्ही प्रेम करता, ….
तेव्हा तुम्ही दुखावले जाता ♥
♥ जेव्हा तुम्ही दुखावले जाता, ….
तेव्हा तुम्ही द्वेष करता ♥
♥ जेव्हा तुम्ही द्वेष करता, ….
तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता ♥
♥ जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, ….
तेव्हा तुम्ही मिस करायला लागता ♥
♥ आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, ….
तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता ♥
♥ ♥ ♥ ♥ पुन्हा प्रेम करू लागता !!
♥
maze pahile prem kavita
जिच्या साठी सकाळी झोपेतून
ऊठण्याची इच्छा होते ते प्रेम आहे
देवाचे दर्शन घेताना ती जवळ
असावी असे वाटते ते प्रेम आहे
भांडल्यावर मनाला खुप
यातना होतात ते प्रेम आहे
जिचे msg आल्याव…र पूर्ण
दिवसाचा थकवा दूर
झाल्यासारखे वाटते ते प्रेम
आहे
जिच्याशी बोलल्यावर मन
मोकळे झाल्यासारखे
वाटते ते प्रेम आहे
स्वताला कितीही त्रास
झाला तरीही तिच्या ख़ुशी
साठी धडपडता ते प्रेम आहे सतत तिचाच मनात विचार येतो
ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई
बाबाच्या सोबत जिचा
फोटो असावा असे आपल्याला
वाटते ते प्रेम आहे
जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात
वाईट वाटते ते प्रेम आहे
हि कविता वाचताना प्रत्येक
ओळीला जिची आठवण
आली तेच प्रेम आहे…..!
यालाच म्हणतात का प्रेम….?
तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा,
आणि फक्त तिच्या अस्तित्वानेचखुल नारी प्रत्येक दिशा,
यालाच म्हणतात का प्रेम….?
तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल,
आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल,
यालाच म्हणतात का प्रेम….?
तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास,
आणि तिने वेड्या गप रे म्हणाव असा मलाप्रत्येक क्षणी होणाराभास,
यालाच म्हणतात का प्रेम….?
तिच्या आठवणीने माझा कासाविस होणारा जीव,
आणि सर्वापेक्षा जास्त प्रेम करूनही तिला न येणारी माझी किव,
यालाच म्हणतात का प्रेम….?
तिला जाणीव पण न होता माझ्या प्रेमाचाझालेलात िला स्पर्श,
आणि हे सर्व वाचून,
तिच्या नाजुक ओठावर आलेल्या हास्याचावेड्याअ क्षयला झालेला हर्ष,
कदाचीत यालाच म्हणत असतील प्रेम….!
जाताना एकदा तरी नजर
वळवून जा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून
जा,
इतरांना नाही निदान मला कळवून
जा
marathi virah prem kavita
झोप उडून गेली, आयुष्याला नवी दिशा मिळून गेली., प्रेमाचं रोपट हृदयात लावून गेली, नव्या विश्वाची ओळख होऊन गेली., कळली नाही प्रीत मनी कशी फुलली, कधी माझ्या हृदयाची राणी ती झाली., माझ्या मनाचं रान ती बहरून गेली, माझा सारा वसंत ती लुटून गेली., माझ्या भोळ्या मनाला ती गुंतवून गेली, मला कायमचा तिचा करून गेली.
भिजून गेला वारा …..
रुजून आल्या गारा …
बेभान झाली हवा ….
पिऊन पाऊस ओला ……
येना जरा तू येना जरा ……
प्रेमाची चाहूल देना जरा ……
तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही.
खरं प्रेम म्हणजेतडजोड
करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे
एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली
मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण
करुन परत जवळयेणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द
न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात
फक्त आनंदाश्रु असणं
marathi prem kavita sangrah
जेव्हा एक मुलीच्या डोळ्यात
आपल्या प्रियकरासाठी अश्रू येतात…
तेव्हा ह्याचा अर्थ
असा होतो कि ती त्याच्या शिवाय जगू
शकत
नाही,
पण…
जेव्हा एक मुलाच्या डोळ्यात
आपल्या प्रियासी साठी अश्रू येतात…
तेव्हा ह्याचा अर्थ असा होतो कि ह्या जगात
तिच्यावर
त्याच्या इतकं प्रेम करणारं कोणीच नसतं…………….
प्रियकर :- प्रेमात खरेच
जादू असते, बघायचे
का ?
प्रेयसी :- हो आवडेल ….. 🙂
तिथे अकरा गुलाबांची फुले
असतात त्यांकडे बोट
करून प्रियकर म्हणतो :-
हि गुलाबांची फुले
किती आहेत मोज बघू ?
प्रेयसी :- अकरा आहेत !!
… प्रियकर :- चूक !! नीट
मोज परत !!
प्रेयसी :- मोजली
….अकराच आहेत !!
प्रियकर :- समोरच्या आरशात
बघून मोज
तुला अकरा नाही बारा फुले
दिसतील 🙂 !! ♥
कशाला हे मन कुणाच्या प्रेमात पडतं,
तू प्रेमात पडलास आपल्याला का सांगत,
कशाला कुणाच्या आठवणीन रात्र रात्र जागत,
कुणी भेटलं नाही तर अश्रू का गाळत,
कशाला कुणाला भेटायला मन इतकं तडफडत,
भेटून गेल्यावरही भेटीसाठी का तळमळत,
कशाला कुणासाठी मन क्षण क्षण झुरत,
रात्रंदिवस विचार करून या जीवाला छळत,
कां इतकं कुणी मनास आवडून जात,
रंगेबिरंगी स्वप्नांना मनात पेरून जात,
हे माझं प्रेम मनाला कसं कळत,
कां आतला आवाज ऐकून मन वेड होत,
काही कां असे नां काहीतरी असं घडतं,
हेचं आपलं प्रेम आपल्याला कळून जात……,
valentine’s day marathi prem kavita
प्रेम आणि पाऊस
दोन्ही हि एकच आहेत.
दोन्ही हि नेहमी
अविस्मरणीय असतात.
पाऊस जवळ राहुन
अंग भिजवतो आणि
प्रेम दुर राहुन डोळे भिजवते!!
तूच सांग मी हसू तरी कस
तू रुसलास तर
जगू तरी कसं माझं सगळ आभाळ
तूच तर आहे तुझ्या इतकं जवळच
दुसर कोण आहे शब्द शब्द मी
मनात साठवून ठेवते तू भेटल्यावर
मन मोकळ करते तुलाही ठाऊक आहे
किती प्रेम करते तूच आहे सखा
तुला आपल मानते तूच सांग मी
जगू तरी कसं तू रुसलास तर
हसू तरी कसं
विसरण्यासाठीच तुला आता,
मि खूप काही करत आहे..
विसरूनच जाईन तुला,
असंच पक्क मनीशी ठरवत आहे.
पण नकळत कुठून एक
झुळूक वाऱ्याची येते.
स्पर्शून या वेड्या मनाला
वाहवत नेते.
पुन्हा तुझ्याच स्वप्नांत,
गुंतवून मला जाते..
ठरवलेलं पक्क मनाशी.
मनातच राहते.
अन् पुन्हा,
आठवणींची तुझ्याच,
अखंड साखळीच सुरु होते.
कविता करणे सोपं कि प्रेम ?
कविता चुकली तर…….. …….
कागद फडता येतो…… ….
पण…….. ………. ……..
प्रेम चुकले तर…….. …….
आयुष्याच्या पत्रावळ्या होतात…..
प्रेम कविता मराठी शायरी
क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणिला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप् रमाणे गळते
तर कधी फ़ुलाप्रमा णे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते..
तुझी नी माझी जोडी अशी
जसे दोन डोळे सखे सोबती….
मी वात तर तु पणती
ह्रद्यात आहे तुझी मुर्ती …..
आपल्या कुडलीत फळाची आहे युती
नवसाला पावेल गणपती….
जपल्या आहेत तुझ्या स्मृती स्वर्गात बांधल्या आहेत आपल्या गाठी ….
हे ह्रदय तुलाच सात घातली आपण दोघे माणिक मोती ….
नदीच्या तिरी प्रतिक्षेसाठी मनाला माझ्या कुंठ फुटती ….
डोळ्यातील पाखरे आकाशात फिरती तुझ्या होकारावरती,…
नाचती गवताची पाती लाल गुलाब घेवुनी हाती..,
तुला पाहून मनात कमळे पुलती माझे ह्रदय आज तुला सांगती…
आपण बनलो आहोत एकमेकांसाठी…
बनशील ना माझ्या जन्माची सोबती.
बोलता ही येत नाही
आणि
लपविता ही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे
हे सांगता ही येत नाही..पहिले जेव्हा तुला फक्त
तुलाच बघत राहिलो..फक्त तुलाच पहावे असेच
दिन क्रम करत राहिलो…खरच तुझ्या नादाने मी
स्वतालाच हरवत राहिलो..काय करू प्रेमाचा ताज महला
सजवीता ही येत नाही,बोलता ही येत नाही
आणि
लपविता ही येत नाही..
मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता
प्रेम कधी नाही विचारत कि,
कोण आहेस तू ?
ते फक्त म्हणते कि ,
माझीच आहेस तू !!
प्रेम कधी नाही विचारत कि,
कुठून आहेस तू ?
ते फक्त म्हणते कि,
माझ्याच हृदयात राहतेस तू !!
प्रेम कधी नाही विचारत कि,
काय करतेस तू ?
ते फक्त म्हणते कि…
माझ्या हृदयाची
स्पंदने चालवतेस तू !!प्रेम कधी नाही विचारत कि,
का दूर आहेसतू ?
ते फक्त म्हणते कि,
माझ्याच जवळ आहेस तू !!
प्रेम कधी नाही विचारत कि,
माझ्यावर प्रेम करतेस का तू ?
ते फक्त म्हणते,
माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू !!
काय माहीत कशी असेल ती !
सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेख खळ पडून हसेल ती,
कारण नसताना खोटीच रुसेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
एकुलती एक सर्वात थोरली असेल ती,
नाहीतर कदाचित धाकटि असेल ती,
संसार कसा सांभाळेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
थोडी नखरेल असेल का ती,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती,
काय माहीत कशी असेल ती !
एवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती,
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,
दुखात ही न तुटता हसेल का ती,
पति पत्नी प्रेम कविता मराठी
इच्छा आहे प्रिये तुला
मिळवण्याची, बाकी
कसलीच आशा नाही
ह्या प्रियकराची..तक्रार माझ्याकडे नाही
देवा कडे कर, काय जरुरत
होती तुला इतके सुंदर
बनविण्याची..प्रेम हे फुल पाखरा सारखे
आहे जेव्हा तुम्ही त्याला
पकडायला जाता तेव्हा
तेदुसरी कडे उडून जाते,पण जेव्हा तुम्ही शांत
असता तेव्हा ते हळूच
येते आणि तुम्हाला स्पर्श
करते, तेव्हा तुमचे होउन
जाते म्हणून वाट बघुयात
आपापल्या फुल पाखराची..
ती सहज म्हणून गेली…
विसर मला
त्या वेळी काही
समजलेच नाही..वारा वाहतोय कि
नाही समजले नाही..डोळे मिटतायत कि
नाही समजले नाही..श्वास पण कसा
घ्यायचा समजले नाही..जगायचे कसे ते
तिने शिकवले…पण
तिच्या शिवाय कसे
जगायचे हे समजलेच नाही..क्षण भरच सहवास राहिला
आठवणी जवळ आल्या पण
त्यांचे जतन कसे करायचे हे समजलेच नाही..प्रेमाच्या या शिडीवर
पाय ठेवला खरा पण
शेवटची पायरीच मला
दिसली नाही..
मराठी कविता प्रेमाची चारोळी
प्रेम
तुझ्या माझ्या मनाच जमतय चांगलं तालमेल
तु नसतांना डोळ्यासामोर होतेय या जीवाची घालमेलउसळुनी या मनात सागराची मोठी लाट
उधानलेल्या या मनाला असतेय फक्त तुझीच वाटतुझ्या सानिध्यात असतांना माझे मी न राहिले
भान हरवुनी स्वतःचे तुझीच होऊनी बसलेमंद हवेच झुळुक येताच जाणवतो तुझा स्पर्श मला
कधीच मी माझ्या मनातुन दुर नाही करु शकणार तुलास्नेहा माटुरकर
एखाद्या दिवशी जर तुला
रडावसं वाटलं तर मला
हाक मार..मी वचन तर
देत नाही की..मी तुला हासवेन..
पण
मी तुझ्यासंगे रडू
तर शकतो..एखाद्या दिवशी तुला
कोणाचेच एकायचे
नसेल मला बोलव..आणि..मी वचन देतो की..
मी शांत राहीन..
पण
एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले
नाही तर..माझ्याकडे त्वरीत ये..
कदाचीत मलाच तुझी
गरज असेल..
आसमाना तील परींच्या
सौंदर्याची राणी आहेस तु…माझ्या मनाची मन
मोहिनी आहेस तु…माझ्या स्वप्नातली
स्वप्न सुंदरी आहेस तु…माझ्या हृदयाची
स्पंदन आहेस तु…माझ्या कवितेतली
कविता आहेस तु…
सच्चा प्रेम कविता मराठी
प्रेमाचा अर्थ काय
एक वेळ सांगशील का ?तुझा नावाचा जप माझ्या,
हृदयातला ऐकशील का…का वेड केलास मनाला
एकदा सांगून जाशील का…वाट तुझी पाहताना रस्तावारती
भेटायला मला येशील का…विसरलीस मला तरी चालेल
स्वप्नात माझा येशील का…थकलेल्या डोळ्यांना हलकी
एकगार झुळूक वाऱ्याची
देशील का…आठवणीत माझा राहतेस
तशी आठवणी मला हि
ठेवशील का…स्वप्नाच्या राज्यात तरी
फक्त माझीच एकदा होशील का..?
★_#…#प्रेमाला प्रेम समजणारा
असा #माझा_प्रियकर असावा…||मी जशी आहे तसेच.,
#माझ्यावर_प्रेम करणारा असावा…||#स्मार्ट नसला तरी.,
चारचौघात #मान ठेवणारा असावा…||#गुलाबाची कळी देत नसला तरी.,
#माझीबाईतू_गं म्हणनारा
असावा…||सिनेमाचा #हिरो नसला तरी.,
घराला घरपण देणारा #खरा_नायक
असावा…||बागेतल्या #फ़ुलांसारखा सुंदर
नसला तरी
चालेल.,
पण..
आंगणातल्या #तुळशीचे_पावित्र्य
समजनारा असावा…||
aathavanitli marathi prem kavita
#_Hii… #_Hello…
चा नया दौर
असला तरी.,
मोठ्यांना #मान देणारा
असावा…||#_Dream_Boy. नसे ना का.,
पण #मनाने_सुंदर आणि
#खरी_साथ देणारा
असावा…#_★
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , प्रेम कविता मराठी | Marathi Prem Kavita | Marathi Poem On Love हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद
हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻