MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज नवरा बायको प्रेम कविता, नवरा तो नवराच असतो, maza navra kavita, husband poem marathi, marathi kavita for husband birthday wish, marathi kavita on marriage life, sorry poem for husband in marathi, marathi prem kavita tyachyasathi, नवरा बायको विश्वास कविता, मराठी नवरा कविता या संधर्भात माहिती मिळेल.
Marathi Kavita On Life Partner
नवरा म्हणजे समुद्राचा
भरभक्कम काठ
संसारात उभा राहतो
पाय रोवून ताठ llकितीही येवो प्रपंच्यात
दुःखाच्या लाटा
तो मात्र शोधीत राहतो
सुखाच्या वाटा llसर्वांच्या कल्याणा करता
पोटतिडकीने बोलत राहतो
न पेलणारं ओझं सुद्धा
डोक्यावर घेऊन चालत राहतो llकधी कधी बायकोलाही
त्याचं दुःख कळत नसतं
आतल्या आत त्याचं मन
मशाली सारखं जळत असतं llनवरा आपल्या दुःखाचं
कधीच प्रदर्शन मांडत नाही
खूप काही बोलावसं वाटतं
पण कुणाला सांगत नाही llबायकोचं मन हळवं आहे
याची नवऱ्याला जाणीव असते
दुःख समजून न घेण्याची
अनेक बायकात उणीव असते llसारं काही कळत असून
नवऱ्याला अपमान गिळावे लागतात
वेदनांना काळजात दाबून
पुन्हा कष्ट उपसावे लागतात llसगळ्यांच्या आवडी जपता जपता
मन मारीत जगत असतो
बायको , पोरं खूष होताच
तो सुखी होत असतो llइकडे आड तिकडे विहीर
तशीच बायको आणि आई
वाट्टेल तसा त्रास देतात
कुणालाच माया येत नाही ll
त्याने थोडी हौसमौज केली तर
धुसफूस धुसफूस करू नका
नवऱ्या विरुद्ध विनाकारण
दारू गोळा भरू नका llदोस्ता जवळ आपलं मन
त्यालाही मोकळं करावं वाटतं
हातात हात घेऊन कधी
जोर जोरात रडावं वाटतं llसमजू नका नवरा म्हणजे
नर्मदेचा गोटा आहे
पुरुषाला काळीज नसतं
हा सिद्धांत खोटा आहे llमी म्हणून टिकले इथं
दुसरी पळून गेली असती
बायकोनं विनाकारण
नवऱ्याला धमकी दिलेली असती llघरात तुमचं लक्षच नाही
हा एक उगीच आरोप असतो
बाहेर डरकाळ्या फोडणारा
घरी म्यांव म्यांव करीत बसतो llसारख्या सारख्या किरकिरीनं
त्याचं डोकं बधिर होतं
तडका फडकी बाहेर जाण्यास
खूप खूप अधीर होतं llघरी जायचं असं म्हणताच
त्याच्या पोटात गोळा येतो
घरात जाऊन बसल्या बसल्या
तोंडात आपोआप बोळा येतो ll
हे पण वाचा 👇🏻
maza navra kavita
नवरा म्हणा , वडील म्हणा
कधी कुणाला कळतात का ?
त्यांच्या साठी कधी तरी
कुणाची आसवं गळतात का ? llपेला भर पाणी सुद्धा
चटकन कुणी देत नाही
कितीही पाय दुखले तरी
मनावर कुणी घेत नाही llवेदनांना कुशीत घेऊन
ओठ शिउन ‘ तो ‘ पडून राहतो
सर्वांच्या सुखासाठी
एकतारी भजन गातो llबायको आणि मुलांनी
या संताला समजून घ्यावं
फार काही नकोय त्याला
दोन थेंब सुख द्यावं llमग बघा लढण्यासाठी
त्याला किती बळ येतं
नवऱ्याचं मोठेपण हे
किती जणांच्या लक्षात येतं ? ll
मराठी कविता नवऱ्यासाठी
नवरा बिचारा काय म्हणतो
किमान ऐकून घ्या
पटलं तर हो म्हणा
नसता सोडून द्यासाध्या क्षुल्लक कारणा वरून
वाद घालू नका
घरातल्या मोठ्या माणसांना
चर चर बोलू नकाकाय उपयोग आहे तुझ्या
उच्च शिक्षित असण्याचा
मुळीच गर्व करू नकोस
थोडं बरं दिसण्याचानौकरी करतेस , हातभार लावतेस
चांगली गोष्ट आहे
फड फड तुझं बोलणं
कुठं बेस्ट आहे ?आईशी सलगी करतांना
सासुशी नको भांडू
आयुष्यातले सुखाचे क्षण
उगीच नको सांडूस्वछता , टापटीप
घर पॉश असावं
याचा अर्थ असा नाही की
घरात कुणीच नसावंथकलेले आई वडील
सांग कुठे जातील ?
आज ना उद्या आई बाबा
मुला कडेच येतीलखरं सांग या मुद्द्यावर
भांडण व्हायला पाहिजे का ?
म्हातारपणी त्यांनी काय
आश्रमात जायला पाहिजे का ?अशिक्षित आहेत ,साधे आहेत
मान्य आहे मला
याचा अर्थ असा नाही की
घालून पाडून बोलाआई वडिलांचं दिसणं नाही
असणं महत्वाचं असतं
म्हातारी माणसं असतील तर
घर शोभून दिसतंआई वडील घरात असणं हा
इंटेरियरचाच भाग आहे
समजू नकोस सुरकूतला चेहरा
पॉश हॉलला दाग आहेखर्च होतो खर्च होतो
होऊ दे आशीर्वाद मिळेल
तू म्हातारी झाल्यावर तूला
सारं काही कळेलशिकली सवरली मुलगी तू
यावरून घटस्फोट व्हावेत ?
लाखोंचं पॅकेज असलं तरी
मार्क शून्य द्यावेततुझ्या आई वडिलांचा
मी आदर करतो
पाहतीस तू चालतांना
त्यांचाही हात धरतोथकलेल्या देहां सोबत
आपलं तुपलं करू नको
माणसांना दूर फेकून
वस्तूंनी घर भरू नकोम्हाताऱ्याना काही नको
फक्त गोड बोला
म्हण न तू सासूबाई
वालाच्या शेंगा सोलामुलींनो समजून घ्या
नवरा काय म्हणतो
माया ,प्रेम ,आपुलकीनेच
फ्लॅट स्वर्ग बनतो !अहंकार आणि राग राग करून
आपलं घरटं मोडू नका
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, नवऱ्यासाठी मराठी कविता | Marathi Kavita On Life Partner हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद
हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻