MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज पावसावर कविता मराठी,famous marathi poems on rain, small poem on rain in marathi, best marathi poems on rain, pahila paus kavita, pahila paus kavita in marathi, पाऊस या विषयावर मराठी कविता या संधर्भात माहिती मिळेल.
Paus Marathi Kavita
आभाळ जेव्हा भरूनयेत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
… मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ……
तुझ्या आठवणींची.. …..!!
एक गुलाबच झाड मी माझ्या
दारी लावला ऊन-पावसा
पासून वाचवत जीवापाड
मी जपला…तरी न जाणे का तो,
पिवळ्या पाणातच जखडला
अन आज पर्यंत एकही गुलाब
त्यावर न बहरला…पण
आज बागेत आली माझी
सोन परी फुलं वेचायला
अन जाता-जाता स्पर्शून
गेली त्या सुकलेल्या झाडाला….
आठवणीत कधी जेव्हा मन
वेड हरवते
कोसळणाऱ्या पावसात मग
आसवांना लावपते
लपलेच प्रेम आणि न
विसरलेल्या आठवणी
ढगालेल तेच वातावर पण
कोसळत नाहीत
आता पुन्हा त्याच टपोर्या
थेंबाच्यासरी
वाहत राहता आता फक्त
त्याच वेड्या आठवणीच्या लहरी
ढग येतात
पण
पाऊस पडत नाही,
आठवणी येतात
पण
चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला
पुढे गाय मागे वासरू,सांग प्रिये मी तुला कसे विसरू.
पावसावर कविता मराठी
चिंब भिजुन पावसात
मन जाऊन बसतं ढगात
मोहरतात साऱ्या भावना
आठवणींच्या कृष्ण-धवल जगातविजांसोबत सुरु होतो
मग ढगांचा लपंडाव
आठवणींनी पुन्हा गजबजतो
माझ्या मनातील उजाड गांवकधी साकारते इंद्रधनु
उन्हासवे ओल्या पावसात
आठवणींना मग येतो बहर
रंगांनी सजल्या दिवसातओंजळीत गर्द अळवाच्या
चमकतात थेंब तेजाचे
आठवणींच्या धुंद धुक्याला
नवकोंदण तव प्रेमाचेकधी संतत धार पावसाची
कधी साथ तिस वादळाची
कधी फुले बाग आठवांची
कधी वाहे सरिता आसवांचीसागराचा उग्र अवतार
सोबतीस पर्जन्य वारा
आठवांच्या रोखण्या ऊधाणा
तोकडा मनीचा किनारादररोज घडे श्रावणात
मेळ ऊन पावसाचा
सोबतीस माझ्या सदैव
हा खेळ संचिताचा
चातका सारखी वाट
पाहतॊय मी धुंद पावसाळ्या
सारखा एकदाच ये तू…प्रेमाची धुंदी हवीय सारी,
तो कैफ जुना पुन्हा एकदा
चढवायला ये तू सात जन्मच
प्रेम माझ हक्काच,या एकाच जन्मात
भरभरून द्यायला ये तू…प्राजक्त फुललाय फांदी वर
ह्या सुगंधाच दान पदरात
त्याच्या टाकायला ये तू…बाग हि बह्र्लीय अशी थंडीत
ही दाणा हिच्या कणसाचा
घ्यायला ये तू…सुगंधाच काय…
बहर सारा तुझाच आहे,
तो लुटायला ये तू…
दोघांचा आहे प्रवास सगळा
पावल माझ्या पावलांशी
जुळवायला ये तू…माझा शब्दन शब्द तुझाच आहे,
कविता आहे तुझ्याचसाठी,
हि वाचायला ये तु
paus kavita
पाऊस सगळ्यांचाच असतो
सगळ्यांनी तो भोगलेलाही असतो
मलाही पाऊस माहीत आहे
मीही पाऊस कधीतरी
भोगलेला आहे
झेललेलाही आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण
लहानपणी माझा बाप
जेव्हा मारायचा
माझ्या आईला
योगायोगाने नाही
पण
पाऊस बाहेर
पडत रहायचा
माझ्या आईचे
पाणावलेले डोळे
मला फक्त दिसायचे
तिच्या डोळ्यातील
पाऊस
तोच पाऊस
मला आठवतो
तोच पाऊस मला
माहित आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेष
अश्रू, हंबरडा
आणि मूक विलाप
माझ्या आईचा
पाऊस म्हणजे
माझ्यासाठी नेहमीच
पाण्याचा अर्थहीन
थेंबांचा
आणि
माझ्या गेलेल्या
आईच्या आठवणींचा
प्रत्येक जण कोणासाठी तरी
झुरत असतो,
जसा पाऊस त्या सरींसाठी,
धरती त्या आकाशासाठी ,
सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,
पण कोणाचेही प्रेम कधी
अपुरे राहत नाही , कारण
सर्वाना विश्वास असतो त्या
मिलनाच्या क्षिताजाचा ……..!! !!
pahila paus kavita
प्रेम आणि पाऊस
दोन्ही हि एकच आहेत.
दोन्ही हि नेहमी
अविस्मरणीय असतात.
पाऊस जवळ राहुन
अंग भिजवतो आणि
प्रेम दुर राहुन डोळे भिजवते!!
“..मी पावसाला विचारलं
तुझं वय काय?पावसानं मला सुंदर उत्तर दिलं,
जर तू पावसात सैर वैरा
आनंदात धावत असशील
तर माझं वय १०जर तू पावसात
कविता लिहित असशील
तर माझं वय १६जर तुला पावसात
विरह जाणवत असेल
तर माझं वय १८जर तुला पावसात
ट्रेकिंग ला जावंस वाटत
असेल तर माझं वय २४जर तुला पावसात
गजरा घ्यावासा वाटत असेल
तर माझं वय ३०जर तुला मित्रांसोबत
पावसात भिजत भजी
खावी
असं वाटत असेल
तर माझं वय ४०मग मी पावसाला म्हणालो
“अरे एक काय ते वय सांग,
शब्दात गुंतवू नकोस!”पाऊस स्मितहास्य देऊन म्हणाला,
पाऊस तू जसा अनुभवशील
तेच माझे वय!!
paus aala marathi kavita
बरस बाबा बरस
आता थांबू नको
शेतकऱ्यांच्या जिवावर
पुन्हा रूसू नको
झाले गेले आता
तु विसरशील का?
आमच्या काळ्या
मातीला भिजवशील का?
वांजोट्या नद्यांची
ओटी भरशील का?
सांग बाबा यंदा
तु बरसशील का?
गुरं ढोरं सारी
कासावीस झाली
तुझ्या चाहूलीने सारी
तल्लीन झाली
कोकीळेचा सुर
पुन्हा गुंजणार का?
काळ्या काळ्या मातीत
मोर नाचणार का?
पाऊल टाकलेली तु
आता मागे नको वळू
जिवाची घालमेल
आता नको करू
देव तु आमचा
फेडू तुझे नवस
बरस बाबा यंदा
तु जोरात बरस…
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , पावसावर कविता मराठी | Paus Marathi Kavita हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद