मराठी उखाणे 5000+ Best Ukhane in Marathi for Female
MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज मराठी उखाणे 5000+ Best Ukhane in Marathi for Female, marathi ukhane for female, marathi ukhane for male, ukhane in marathi for male, ukhane in marathi for female, marathi ukhane for bride, marathi ukhane for groom, marathi ukhane comedy, best marathi ukhane for bride, ukhane in marathi comedy, marathi ukhane list, long marathi ukhane for female, marathi ukhane navardevasathi, latest marathi ukhane, latest marathi ukhane, marathi ukhane for satyanarayan pooja, marathi ukhane for pooja, marathi ukhane for male funny, marathi ukhane for male romantic, smart marathi ukhane female, smart marathi ukhane male, funny marathi ukhane या संधर्भात माहिती मिळेल.
गोपा देताना घ्यावयाचे उखाणे | Best Ukhane in Marathi for Female | Gopa detana ukhane in marathi
लग्नात घ्यावयाची उखाणे | smart marathi ukhane for female
आकाशात उगवला चंद्र, निषेला लागली चाहूल
….. च्या संसारात टाकले पहिले पाऊल.
माहेरची नाती म्हणजे जणु रेशमाच्या गाठी
रेशिंबंध सोडून सासरी आले….. च्या साठी.
माहेरची माया पाश सोडून आले आज सासरी
माप ओलांडून प्रवेश करते….. च्या घरी.
भिल्लीनीच्या च्या नृत्याने शंकर झाले मोहित
संसाराला सुरुवात करते…… च्या सहीत.
नाव आहे ओठी पण लज्जेच बंधन
…… चे नाव घेऊन सोडते मी कंकण.
कळत नाही माझे मला आहे स्वप्न की भास?
….. ना देते मी जिलेबीचा गोड घास.
Ukhane for female
मनीमानसी चे स्वप्न आज झाले साकार
….. नी केलाय माझा पत्नी म्हणून स्वीकार.
बरेच दिवसांची आकांक्षा आज झाली साकार
….. नी करावा जिलेबीच्या घासा चा स्वीकार.
शंकराच्या मंदिरामध्ये समोर असतो नंदी
….. च्या संसाराची आज झाली नांदी.
देवघरातला नंदादीप तेवत ठेवते अखंड
….. ना घास देते मी पुरी आणि श्रीखंड.
साखरपुडा झाला, लग्न ठरलं ,सर्वांनी केलं अभिनंदन
….. च्या जीवनाचे करेन मी नंदनवन.
Ukhane for female
रंगांमध्ये जावे रंगून ,सुरांमध्ये व्हावे दंग
….. चा संसार आदर्श करण्याचा बांधते मी चंग.
मनासारखा पती मिळावा म्हणून हरितालिके ला पुजल
…… च्या नावाने आज गळ्यात मंगळसूत्र बांधलं.
कॉम्प्युटरचा शोध लागला ,जग जवळ आलं
….. व….. च आज थाटात लग्न झालं.
संसार रुपी निरांजनात लावते प्रीतीची फुलवात
….. च्या साथीने करते संसाराला सुरुवात.
smart marathi ukhane for female
जिजाऊच्या पोटी जन्मले शिवाजी सारखे सुपुत्र
….. च्या नावाने गळ्यात घातले मंगळसूत्र.
सोन्याच्या कोंदणात चमकतो अस्सल हिरा
….. सारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा.
मंडपात पसरलाय उदबत्त्यांचा सुवास
….. ना देते मी लाडूचा गोड घास.
लग्न घराच्या वराडाची बसली खाशी पंगत
….. च्या घरी सर्वांची होईल आगत-स्वागत.
दार अडवून उभी आहे ननंद आणि जाऊ
लाज वाटते बाई मला…… च नाव कसे घेऊ.
आनंदाने वेचते मी आशीर्वादाची फुले
….. च्या घरी आज पहिले पाऊल टाकले.
मंगळसूत्राच्या काळया पोती मध्ये जोडले सासर माहेर
….. नी केला आज मला सौभाग्याचा आहेर.
संसार रुपी सागरात डोलते आयुष्याची होडी
सर्वांच्या आशीर्वादाने सुखी राहो…… व…… ची जोडी.
Smart marathi ukhane for female
काळोखी रात्र संपली, उषेचे लागली चाहूल
….. च्या संसारात टाकते पहिले पाऊल.
नेत्रा तल्या आनंदाश्रुसह माहेर मी सोडले
….. ज्या घरांमध्ये आज पहिले पाऊल ठेवले.
अवघे जीवन आनंदाने कसे भरभरून आले
….. चे आज मी सौभाग्यवती झाले.
शांत निरभ्र आकाशात चांदण्यांची झाली बरसात
….. चे नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात.
नागपूरची संत्री आणि नाशिकचे प्रसिद्ध द्राक्ष
….. शी झाला विवाह आज तुम्हा सर्वांचे साक्ष.
लग्न करीन तर तुमच्याशीच केला होता निग्रह
….. चे नाव घेते आता करू नका आग्रह.
कोकणात जाताना लागतो वळणावळणाच्या घाट
….. चे नाव घेऊन सोडते भाऊ भावजयीची गाठ.
पहाटेच्यावेळी दवबिंदू पानावर पसरले
….. ना पाहून मी देहभान विसरले.
सर्वांना करते नमस्कार, आशीर्वादाचा द्या आहेर
….. च्या साथीसाठी सोडून आले माहेर.
एकनाथांच्या घरी हरि होतो दास
….. चे नाव घेते तुमच्यासाठी खास.
मंगळागौरीच्या वेळी घ्यावयाचे उखाणे | Mangala Gauri Ukhane
Mangala gouri ukhane in marathi for female
श्रावण सरित हिवा साज लेवून सृष्टी देवी सजली,
…… च्या सौख्या स्तव मंगळागौर पुजली.
सौभाग्याची जीवन ज्योत प्रीती तेलाने तेवाते,
…… ना दीर्घायुष्य मंगळागौरीस मागते.
श्रावण महिन्यातील सण म्हणजे उत्सवाची पर्वणी,
….. च नाव घेते मंगळागौर कारणी.
अशोकवनात सिंह करी गर्जना,
…… सुखी राहूत ही मंगळागौरी कडे प्रार्थना.
मंगळागौरी मंगल माते वंदन करिते तुला,
…… च नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.
वेलीला शोभे फुल, स्त्रीला शोभे अपत्य,
…… च नाव घ्यायला मंगळागौरीचं निमित्त.
मोती होऊन सुवर्णाच्या ताटात बसण्यापेक्षा, जलबिंदू होऊन चातकाची भागवावी तहान,
…… सोबत केली मंगळागौरीची पूजा महान.
संसाराच्या रांगणी प्रीतीची चंद्रकोर,
…… च्या सुखासाठी पुजली मंगळागौर.
सौभाग्यवती चा अलंकार म्हणजे काचेचे चुडे,
….. च नाव घेते मंगळागौरी पुढे.
प्रत्येक धार्मिक विधी मागे लपलेला असतो खरा अर्थ,
…… च नाव घेते मंगळागौर प्रित्यर्थ.
वर्षा ऋतूत हसते धरित्री,
….. च नाव घेते मंगळागौरी च्या रात्री.
निसर्गरम्य श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरते ओटी,
….. च नाव घेते खास तुमच्यासाठी.
मेघमल्हार रंगतोय, श्रावण सर कोसळतोय,
…… च्या नावाने मंगळागौर सजते.
रामाने जन्म घेतला कौशल्याच्या पोटी,
…… च नाव घेते मंगळागौरी साठी.
गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी,
….. च नाव घेते मंगळागौरी पाशी.
मंगळागौरी मंगल माते वंदन करते तुला,
…… च नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.
संसाराच्या देवार्यात सुख दुःखाचा खेळ अविनाशी,
….. ना दीर्घायुष्य मागते मंगळागौरी पाशी.
आयुष्याचा लावीन दिवा, कष्टांचे घालीन भरण,
…… च नाव घ्यायला मंगळागौरीच कारण.
दसऱ्याला आपट्याची पान हृदय मिलन दर्शविते,
…… ना दीर्घायुष्य मंगळागौरीस मागते.
समईतील ज्योती, भक्तिभावाने उजळविते,
….. नाव मंगळागौरी पुढे घेते.
आकाशात दाटून आले मेघ, मोर लागले नाचायला,
…… च नाव घेते मंगळागौरीला.
बारसे विशेष | Barshache ukhane in marathi
फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे,
…… च्या बाळाचे आज बारसे.
गुलाबाचा ताटवा लतांचा कुंज,
…… च्या बाळाची आज आहे मौज.
गोकुळात कृष्ण सर्वांना झाला हर्ष,
…… च्या बाळाचं आज आहे बारसे.
दाराच्या चौकटीला गणपतीचे चित्र,
…… मुळे मला मिळाले मातेच मानपत्र.
संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल,
…… च्या बाळाची सर्वांना लागली चाहूल.
मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा,
…… च्या वंशात आला दिप नवा.
थोर कुळात जन्मले, सुसंस्कारात वाढले,
……. च्यामुळे आई आज झाले.
मोत्याची माळ सोन्याचा साज,
…… च्यामुळ आई झाले आज.
शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊंची कुशी,
…… नाव घेते बाळाच्या बारशाचे दिवशी.
पंचम सूर म्हणजे संगीताचा साज,
…… रावांच्या बाळाचं बारसं आज.
हिऱ्याच्या कंठाला, मोत्याचा घाट,
…… च्या बाळाचा बारशाचा थाट.
जीवनात ही घडी अशीच राहू दे,
…… चेक प्रीती फुल असेच हसू दे.
संक्रांत विशेष | sankrat ukhane in marathi for female
गोडी घ्यावी मुळापासून स्निग्धता घ्यावी तिळापासून,
…… च नाव घेते आशीर्वाद द्यावा मनापासून.
संक्रातीच्या शुभ दिने तिळगुळ घ्या बोला गोड,
…… ची लाभली मला संसारात जोड.
संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर बोराणे ओटी,
…… च नाव घेते खास तुमच्यासाठी.
स्नेहा मधला मधुर गोडवा टिकावा वर्षभर,
…… च नाव घेते पाळी आली …… वर.
संक्रातीच्या सनाला येतात नटून बायका,
…… च नाव घेते सर्वजण ऐका.
तिळगुळ घ्या गोड बोला, संक्रांतीच्या शुभेच्छा देते गोडीन,
…… च नाव घेते प्रेमभाव भक्तीने.
संक्रांतीच्या सणाला लागतात गाजर, बोरं, ऊस,
…… बरोबर संसारात मी आहे खुश.
नवीन वर्षाचं स्वागत केलं उत्साहाला आलं उधाण,
…… नाव घ्यायला आज संक्रातीचे कारण.
भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,
…… नाव घेते संक्रातीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.
संक्रांतीच्या सणाला करतात हलव्याचा साज,
…… मुळे झाले मी सौभाग्यवती आज.
आंबे जगन माते वंदन करते तुला,
…… नाव घेते संक्रांतीच्या सणाला.
MarathiStyle.com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , मराठी उखाणे 5000+ Best Ukhane in Marathi for Female हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद